शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आजचा अग्रलेख: काँग्रेसच्या वाटेवर भाजप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 10:41 IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहण्यात चौथे स्थान पटकाविणारे विजय रुपानी यांचा राजीनामा का घेण्यात आला, याचे अधिकृत स्पष्टीकरण भाजपने अद्याप दिलेले नाही.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहण्यात चौथे स्थान पटकाविणारे विजय रुपानी यांचा राजीनामा का घेण्यात आला, याचे अधिकृत स्पष्टीकरण भाजपने अद्याप दिलेले नाही. दरम्यान, गुजरातचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दोनच पक्षश्रेष्ठी आहेत. शिवाय दोघेही गुजरातचे असल्याने त्यांच्या निर्णयावर स्पष्टीकरण तरी कोण देणार? नरेंद्र मोदी, हितेंद्र देसाई, माधवसिंह सोळंकी यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान पटकाविणारे विजय रुपानी यांच्या राजीनाम्याविषयी विविध कारणे चर्चेत आहेत. 

कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी प्रभावी काम केले नाही, पक्षसंघटन आणि सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. रुपानी हे फारच मितभाषिक आहेत, आक्रमक भूमिका घेत नाहीत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ते जैन समाजाचे असल्याने पटेल-पाटीदार समाज नाराज आहे, असाही अर्थ लावला जात आहे. कोविड संसर्गाच्या काळातील गुजरात सरकारची कामगिरी चांगली नव्हती, गुजरात उच्च न्यायालयानेही त्याबाबत ताशेरे ओढले होते, हे एकमेव कारण पटण्याजोगे आहे. कारण नरेंद्र मोदी २०१४ मध्ये केंद्रात पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर आनंदीबाई पटेल यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. डिसेंबर २०१७ च्या निवडणुकांपूर्वी त्यांना बदलून विजय रुपानी यांची निवड केली. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चौफेर चढाई करूनही साध्या मताधिक्याने का असेना रुपानी यांनी सत्ता टिकविली होती. अर्थात अशा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यापेक्षा नरेंद्र मोदीच प्रचारात आघाडीवर असतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली देशात आणि सर्व राज्यांत निवडणुका लढविल्या जातात. त्यामुळे हे कारणही पटत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बिगर गुजराती आहेत. तरीदेखील रुपानी आणि पाटील यांनी अलीकडे झालेल्या सहा महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या. नगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी ७५ जिंकल्या. तालुका पंचायतीत २३१ पैकी १९६ जिंकल्या आहेत. शिवाय इतर पोटनिवडणुकाही जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झालेली नाही, हे स्पष्टच होते. तरीदेखील कारण न देता विजय रुपानी यांना बदलण्यात आले. पटेल-पाटीदार समाजाकडे नेतृत्व नाही, हे एक कारण असू शकते; पण त्याचा गुजरातच्या राजकारणावर थेट परिणाम सध्या तरी झालेला दिसत नाही. 

भाजपने काँग्रेसची संस्कृती मात्र स्वीकारल्याचे मान्य करावे लागेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कालावधी सोडला तर काँग्रेसने अपवाद वगळता कोणाही एका मुख्यमंत्र्याला पूर्ण काळ सत्ता दिली नाही. त्याच वाटेवर भाजप वाटचाल करतो आहे आणि आपले पक्षश्रेष्ठत्व अधिक श्रेष्ठ असल्याचे जाणीव करून देत आहे. वर्षभरात चार राज्यांतील पाच मुख्यमंत्री बदलण्यात आले. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांना बदलून तीरथ सिंह रावत यांना आणले. त्यांनाही लगेचच बदलण्यात आले. आसाममध्ये प्रथमच पाच वर्षांची सत्ता राबवून पुन्हा विजय मिळवणारे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना बदलण्यात आले. कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांना घरी पाठवून गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे सूत्रे दिली. आता विजय रुपानी यांच्यावर तीच वेळ आली. प्रथमच आमदार झालेले आणि मंत्रिपदाचाही अनुभव नसलेले भूपेंद्र पटेल यांची आश्चर्यकारकरीत्या निवड केली  गेली. त्यांचे नावही चर्चेत नव्ह

ते. वास्तविक भाजप पंचवीस वर्षे गुजरातमध्ये सत्तेवर आहे. त्यांची भाकरीच करपू लागली आहे. मागील निवडणुकीत निसटता विजय मिळाला होता. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी सर्व सव्वीस जागा भाजपला देणाऱ्या मतदारांनीच काँग्रेसला चांगले मतदान केले आहे. उत्तर प्रदेश किंवा  बिहार प्रांतामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था नोंद घेण्यासारखी राहिलेली नाही, अशी अवस्था गुजरातमध्ये नक्कीच नाही. किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटायला नको. विकासाचे माॅडेल म्हणून गुजरातचे उदाहरण देत भाजपने देशाची सत्ता हस्तगत केली. त्याच राज्यात कोविडसारख्या महामारीत सर्व पातळीवर अपयश येत गेले. कोरोनाचा अटकाव करण्यात अपयश आले. या सर्वांचे खापर विजय रुपानी यांच्यावर फोडून पटेल-पाटीदार अस्मिता जागृत करीत हार्दिक पटेल यांना शह देण्याची ही नवी खेळी असू शकते. त्यातून नवे मुख्यमंत्री अननुभवी आहेत. त्यांच्याकडून अपेक्षाही खूप असणार आहे. केवळ त्यांचे नाव पटेल आहे म्हणून गुजरातच्या निवडणुका जिंकणे कठीण आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस