शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाढदिवस की घटदिवस ?, कधी तिथीने तर दुस-यांदा काय तर दिनांकानं करतात वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 5:38 AM

वाढदिवस साजरा करायला कोणाला आवडत नाही बरे? सा-यांनाच आवडते. काही काही तर वर्षातून दोन-दोन वेळा अधिकृतपणे वाढदिवस साजरा करणारे उत्साही महाभाग भेटतात.

- डॉ. नीरज देववाढदिवस साजरा करायला कोणाला आवडत नाही बरे? सा-यांनाच आवडते. काही काही तर वर्षातून दोन-दोन वेळा अधिकृतपणे वाढदिवस साजरा करणारे उत्साही महाभाग भेटतात. एकदा काय तर तिथीने तर दुस-यांदा काय तर दिनांकाने. प्रत्येक संस्कृतीत, समाजात या ना त्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची प्रथा असते; कधी मेणबत्ती विझवून तर कधी दिवा लावून!माझ्या मनात प्रश्न डोकावतो; वाढदिवसाला वाढदिवस का म्हणतात हो? खरे तर आपण रोजच वाढत असतो. येणारा व जाणारा प्रत्येक दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वाढ करणारा वाढदिवसच असतो. मग जन्मदिवसालाच वाढदिवस का म्हणावे? इंग्रजीत तर वाढदिवसाला बर्थ डे अर्थात जन्मदिवसच म्हणतात. पण खरंच तो जन्मदिवस असतो का? नाही ! आपल्याला जन्म देणारा दिवस तर दूर कोठेतरी फेकला गेलेला असतो; वीस, पंचवीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ वर्षे मागे !काळाने फेकलेला हा गतकाळाचा चेंडू दूर दूरच जाणारा असतो. तो कधीही आपल्या टापूत न येणारा असतो. मग तो गेलेला क्षण असो वा वर्षे; युगे असोत. खरे तर आपल्याला जन्म दिलेला दिवस काळाच्या गर्तेत केव्हाच गडप झालेला असतो. गेलेले वर्ष पुन्हा येणारे नसते. त्यामुळे ते आ-यासारखे जन्मवर्ष म्हणून आपल्या जीवनात घट्ट बसते. महिन्यात तीस-एकतीस दिवस असतात. त्याला पकडणे आपणास शक्य नसते व उपयोगाचेही नसते. म्हणून आपण दरवर्षी येणारा आपला जन्मदिवस दाखवणा-या दिनांक वा तिथीलाच वेठीस धरतो. आपली पाळेमुळे जोडलेली असतात ३६६ दिवसातील त्या एखाद्या दिनांकाशी वा एखाद्या तिथीशी. वर्षामागून वर्षे उलटतात. पण आपले त्या दिनांकाशी जडलेले नाते सरत नाही. सरावे असेही वाटत नाही. त्यामुळेच वाढवर्ष न म्हणता वाढदिवस म्हणत असावेत.गंमत अशी ज्या दिनांकावर आपण जन्मलेलो असतो तो दिवस, तो दिनांक पहिली चार-पाच वर्षे तरी आपल्याला कळतही नसतो. कारण कालगणनेची धारणा अद्याप विकसित झालेली नसते. मग तो आठवणे तर दूरच राहिले. बालपणी त्या दिवसाचे स्मरण केवळ केक कापायचा दिवस इतकेच असते. अन एकदा केक कापला की, त्यानंतर निदान सात-आठ दिवस तरी मला केक कापायचा, असा हट्ट बालपणी सर्वच करीत असतात.तर सांगत काय होतो, त्या दिवसाशी असलेले आपले नाते त्या दिनांकाला आपल्याला व आपल्या आप्तस्वकीयांना प्रकर्षाने जाणवते. तो दिनांक आपण पकडून ठेवलेला असतो मैलाचा दगड म्हणून. जसजसे संवत्सररूपी मैलाचे दगड मागे जाऊ लागतात तसतसा मी वाढतच जात असतो म्हणून तो वाढदिवस - पृथ्वीवरील माझ्या मुक्कामाचा !हा मुक्काम स्थायी नसतो. सरतोच एक ना एक दिवस! मजेची गोष्ट हीच की, मी येतो तो दिवस अन् जातो तो दिवस माझा मलाच अंकित करता नाही येत. काय गंमत बघा, माझा श्रीगणेशा अन् माझी इतिश्री मलाच नाही पाहता येत. आपण मोजतो केवळ मधलेच वाढदिवसरूपी मैलाचे दगड!मला हाही प्रश्न पडतो; याला वाढदिवस म्हणावे की घटदिवस? खरं तर तो घटदिवसच असतो. तो आठवण करून देतो, झाले तुझे एक वर्ष सरले, इथल्या मुक्कामाचा आणखी एक टप्पा सरला. ज्या देहाचा तू एवढा मोह करतोस; वाढदिवस करतोस तोच सोडण्याची घटिका जवळजवळ येतेय। आता तरी अंतर्मुख हो! विचार कर ! अरे वेड्या,वाढदिवस जसा तुझा असतो,तसाच माझाही असतो।तिचा, त्याचा, हिचा, याचाएक दिवस साºयांचाच असतो ।खरे तर वाढ कसलाघटदिवस तो;एक दिवस घटवूनयेतो तसा जातो ।आपण मात्र त्यालामैलाचा दगड मानतोपंचविशी, गद्धे पंचविशी,तिशी अन् पन्नाशी मिरवित मिरवित फिरतो ।ज्यांना येत नाही गणितत्यांचे बरे असतेआयुष्याची बेरीजअठरावरच अडते.असो; जरी देह सोडण्याची वेळ जवळ येत चाललेली असली तरी अडचण ही असते की, त्याचा नक्की दिनांक कोणालाच ठाऊक नसतो. त्यामुळे किती घटलेत ते तर कळते पण किती मधून घटलेत ते सांगता येत नाही, ढोबळ अंदाज बांधता येतो शंभरातून सरल्याचा, पण तोही अंदाजच. निश्चित काही नाही, म्हणून तर आपल्या आयुष्यातून दरवर्षी घटणाºया वर्षाला आपण घटदिवस नाही तर वाढदिवस म्हणत असतो.(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)