शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

उदंड अर्ज, अपुरी माहिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:45 IST

विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला अन् मुख्यमंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. चला, तेवढेच चहापानाचे पैसे वाचले! नाहीतरी विरोधकांना दुधात मिठाचे खडे टाकायची सवयच असते म्हणा. आधीच मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार. मी म्हणतो, या उंदरांनी सरकारी फायली कुरतडण्याऐवजी माहिती अधिकाराचे अर्ज का कुरतडू नये?

 - नंदकिशोर पाटीलविरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला अन् मुख्यमंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. चला, तेवढेच चहापानाचे पैसे वाचले! नाहीतरी विरोधकांना दुधात मिठाचे खडे टाकायची सवयच असते म्हणा. आधीच मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार. मी म्हणतो, या उंदरांनी सरकारी फायली कुरतडण्याऐवजी माहिती अधिकाराचे अर्ज का कुरतडू नये? उगीच ते ‘आरटीआय’वाले नको तिथं तोंड घालत असतात. परवा तर त्यांनी गेल्या चार वर्षात किती टिश्शूपेपर वापरले गेले, याचीच माहिती मागितली! आता हा हिशेब कोण ठेवणार? समजा ठेवला, तरी ते आघाडी सरकारच्या काळात आणि युतीच्या काळात वापरलेल्या टिश्शूपेपरचा हिशेब मांडणार आणि न्यूजचॅनलवर फडणवीस सरकारचा ‘टिश्शूपेपर घोटाळा’! अशी ब्रेकिंगन्यूज झळकणार. तरी बरं, मंत्रालयातील सामान्य प्रशासनात खूप हुशार लोकं बसलेली आहेत. टिश्शूपेपरच्या अर्जावर त्यांनी सरळ उत्तर देऊन टाकले ‘सरकारचा कारभार आता पेपरलेस झाला असल्यामुळे टिश्शूपेपरची आवश्यकता उरलेली नाही. सबब हा अर्ज निकाली काढण्यात येत आहे!’परवा सुधीरभाऊ सांगत होते. वृक्षारोपण अभियानाबद्दल त्यांच्याकडेही म्हणे ‘आपण लावलेल्या तीन कोटी वृक्षांपैकी किती झाडं जगली? अशी विचारणा करणारा माहितीचा अर्ज आला होता. त्यावर वनखात्याच्या अव्वल सचिवाने लिहिले-‘सदर अभियानात रोपांची लागवड करण्यात आली होती. रोपटं अजून शिशु अवस्थेत आहेत. ते झाडात आले की आपणास कळविले जाईल!’ वनखात्याकडून आलेले हे उत्तर वाचून तो आरटीआय कार्यकर्ता हातात दोरखंड घेऊन झाडांच्या शोधात रानोमाळ फिरत असल्याचे कळते...परवा आमचा जळगावी नियोजित दौरा होता. ंअमृत योजनेचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रम ठरलेले होते. पण निमंत्रण पत्रिकेतील प्रमुख अतिथींची यादी बघून अचानक आमच्या पोटात कळ आली. त्यामुळे ऐनवेळी आम्हाला तो दौरा रद्द करावा लागला. त्यावरही एकाने लागलीच दुसऱ्या दिवशी आरटीआयखाली लांबलचक अर्ज धाडला. ‘तब्येतीचे कारण पुढे करून आपण जळगावचा दौरा रद्द केला हे खरे असेल तर आपण कोणत्या डॉक्टरांकडे औषधोपचार घेतले? की आपले पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ सहकारी नाथाभाऊंचे नाव पत्रिकेत बघून आपल्या पोटात मुरडा आला? जर तसे असेल तर यावर कायमचा विलाज का करून घेत नाही?की तुम्ही येण्याची गरज नाही. मी बघून घेतो, असा शरद पवारांनीच सल्ला दिला होता? की तुम्हास जळगावपेक्षा अण्णा हजारे यांचे उपोषण महत्त्वाचे वाटले? तसे असेल तर अण्णांना तुम्ही जे लिंबूपाणी पाजले, ते लिंबू तुम्ही कुठून मागवले होते का? जर ते बारामतीहून मागविले असतील तर त्यावर किती खर्च आला? की ते फुकटात मिळाले?’ मारुतीच्या शेपटीहून लांबलचक असा हा अर्ज वाचून मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचा-यांना अक्षरश: घाम फुटला. तो पुसता-पुसता कार्यालयातील सगळे टिश्शूपेपर संपले!ता.क. माहिती अधिकाराच्या अर्जातून सुटका करून घेण्यासाठी सरकार एक विधेयक आणण्याच्या विचारात आहे. विधेयकाचे नाव असेल, ‘माहिती प्रतिबंधक, शासकीय अधिकार विधेयक!’

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार