शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

‘ऑटोमेशन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चे जाळे विस्तारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 05:42 IST

११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या तंत्रप्रगतीतील २०२० आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे.

- दीपक शिकारपूर​​​​​​​(संगणक साक्षरता प्रसारक)११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या तंत्रप्रगतीतील २०२० आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा वेग सध्याच चक्रावून टाकणारा झाला आहे. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे; माहितीने जागतिक अर्थव्यवस्थेत आता ‘तेला’ची जागा घेतली आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणे आज चैन नसून गरज होत चालली आहे. यंत्रमानव व मानव ह्यामधील दरी आगामी शतकात कमी कमी होणार आहे.‘आॅटोमेशन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रे होत चालली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, बिग डेटा अ‍ॅनालिसिस, रोबोटिक्स या आणि यांसारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक आॅटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि स्वयंभू बनत आहेत, यात शंकाच नाही. सेलफोन, जीपीएस, इंटरनेट आणि नॅनो उर्फ सूक्ष्म तंत्रज्ञान यांच्या संगमातून एक अत्यंत वेगळ्याच प्रकारचे जग लवकरच आपल्या आसपास दिसू लागणार आहे. त्यासंदर्भात अनेक प्रकारचे संशोधन सध्या जगभर सुरू आहे. त्यातून हाती येणारी माहिती थक्क करून सोडणारी, विस्मयचकित करणारी आहे. संगणकीय सूक्ष्मतंत्राचा प्रवेश प्रत्येक पैलूमध्ये झालेला आढळेल. किंबहुना तो तसा असणे हेच आपण गृहीत धरू, इतक्या सहजपणे हा बदल होणार आहे.याला ‘इंटेलिजंट कॉम्प्युटिंग’ असे म्हटले जाते. यामुळे ज्या बाबींची आपण आत्ता कल्पनाही करू शकत नाही, त्या ह्या तंत्रसंगमातून सहजशक्य होणार आहेत. अगदी साधे उदाहरण घेऊ. समजा, ‘तुमचा हरवलेला चष्मा मोठ्या बेडरूममधल्या पलंगावरील उशीखाली आहे,’ हे सांगण्याचे कामही हे तंत्रज्ञान करेल किंवा आपण कार चालवत असाल आणि पुढे एक-दोन किलोमीटरवर वाहतूक-कोंडीची लक्षणे दिसू लागताच- प्रत्यक्ष कोंडी होऊन गाड्या थांबण्याआधीच बरे नाही का? - अशावेळी गाडीतील जीपीएस यंत्रणा पर्यायी मार्ग शोधेल. आपण मॉलमध्ये खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांपैकी कोणते ‘जंक फूड’ आहे आणि कोणते पदार्थ आरोग्यास हितकारक आहेत याबाबतही संगणक क्षणार्धात सल्ला देईल. ही सारी ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’ (आयओटी) या संकल्पनेची कमाल आहे.आपल्या आसपासच्या डिजिटल विश्वाची सतत उत्क्रांती होत राहणार आहे. त्यामुळेच या तंत्राचे व्यावहारिक उपयोगही वाढताना दिसतील. लवकरच आपल्या जीवनशैलीत आणि दिनक्रमात इतक्या सहजपणे हे तंत्र मिसळणार आहे, की एखाद्या वस्तूबाबत अशा प्रकारची अतिरिक्त माहिती मिळणे आपण गृहीतच धरणार आहोत. आरोग्य, प्रवास, खरेदी यासारख्या रोजच्या व्यवहारातील सर्व पैलूंना हे तंत्र स्पर्श करणार आहे. माहितीचे महाजाल आणि तिचे विकेंद्रीकरण हे याचे मूलतत्त्व असणार आहे. या तंत्रानुसार संबंधित यंत्रणेला दिल्या जाणाºया मर्यादित निर्णयक्षमतेमुळेही एकंदर चित्रावर मोठा आणि मनोरंजक परिणाम दिसू लागेल. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलतील. येत्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल. आधुनिक तंत्रज्ञानाला न घाबरता, त्याच्यापासून दूर न पळता त्याला मित्र मानणे आणि त्याच्याबाबत अधिक माहिती मिळवणे काळाशी सुसंगतच ठरणार आहे. अर्थात हे भविष्य ध्यानात घेऊन शिक्षणक्रम, ते शिकवणाºया संस्था आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती यामध्येही कालानुरूप बदल व्हायला हवेत.शाळकरी मुलेमुली आणि महाविद्यालयीन युवा पिढीतील कल्पकता आणि नवनिर्मितीच्या ईर्ष्येला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. कारण अशाच व्यक्ती चाकोरीबद्ध कामांवर (जी कमी होत जाणार आहेत) अवलंबून न राहता स्वत:ला आणि समाजाला पुढे नेऊ शकतील. जर आपल्याला हे जागतिक प्रवाह उच्च शिक्षण पद्धतीत आणायचे असतील, तर पूर्ण ढाचा बदलायला हवा. गुणाला (मार्क्स) कमी महत्त्व देऊन मूल्यांकनाला जास्त महत्त्व द्यायला हवे. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीही लवचीक आणि बदलत्या गरजा वेगाने सामावून घेणारी असायला हवी.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानscienceविज्ञान