शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 06:59 IST

उंच आकाशात झेप घेताना मातीचा विसर पडतो; पण या मातीतूनच आपण जन्मलो. शेवटी तिच्यातच मिसळायचे आहे! आपली माती ऊर्जेचे भांडार आहे. आपली पृथ्वी, आपला देश, आपल्या गावाच्या मातीतच स्वर्ग दडलेला असतो

 विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या गावात प्रवेश करताच गावाची माती कपाळाला लावली आणि म्हटलं की, स्वर्ग हाच आहे! खरं सांगतो, त्यांच्या या एका कृतीनं मी आठवणींच्या लाटांमध्ये चिंब भिजून गेलो. खोल खोल कुठंतरी हरवून गेलो. किती आठवणी आहेत... काही बालपणाच्या, काही तारुण्यातल्या तर काही अगदी आत्ता आत्ताच्या. सगळ्यांचा मथितार्थ इतकाच, की आपण सर्व माती आहोत. ही माती हाच खरा स्वर्ग आहे! (The attraction of the soil in the blood, the freshness of the soil in the mind !!)लोकांना आपल्या घराची सर्वाधिक तीव्र आठवण कधी येते याचं एक सर्वेक्षण साधारण २५ वर्षांपूर्वी झालं होतं. दिल्लीत काम करणाऱ्या एका परिचारिकेचं उत्तर मला हलवून गेलं. ती म्हणाली होती, ‘तापलेल्या मातीवर पावसाचे पहिले थेंब पडतात आणि एक हरखून, वेडावून टाकणारा सुगंध दरवळू लागतो तेव्हा मला गावाची आठवण येते!’खरंच,  मातीच्या या गंधाला तोड नाही. माझं बालपण या मातीच्या वासानं न्हाऊन निघालेलं होतं, हे माझं भाग्यच. त्या स्मृती इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत, की आजही बागेत फिरताना पावलांना, हातांना होणारा मातीचा स्पर्श माझ्या तनामनाला प्रमुदित करतो. तो स्पर्श मला माझ्या बालपणात घेऊन जातो. माझ्या मामाचं गाव बेला आणि बाबूजींचं आजोळ मादनी!  लहानपणी या दोन्ही गावांना आम्ही खूपदा जायचो. त्या काळात आजच्यासारख्या मोटारी नव्हत्या. त्यामुळं आजोळी घेऊन जाणारा हा प्रवास  बैलगाडीनं व्हायचा. वाटेतले धुळीचे लोट अंगावर घेताना कपडे मळतील याची फिकीर  अजिबात वाटत नसे. उलट त्या धुळीतही एक वेगळं सुख दडलेलं होतं. मुलं धुळीत खेळूनच मोठी होत. मुलं जेवढी मातीत खेळतील तेवढी अधिक धडधाकट, घट्टमुट्ट होतील अशीच तेव्हाची धारणा होती. आजच्या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे माती शरीरामध्ये प्रतिपिंडं - अँटिबॉडीज तयार करते; पण सांगणार कोण आणि कुणाला? हल्ली शहरातल्या काय; पण खेड्यातल्याही आया मुलांच्या अंगाला मातीचा स्पर्श होणार नाही, याची फार काळजी घेतात. का? तर मातीत हुंदडल्यास मुले आजारी पडतील, अशी भीती त्यांना वाटते... ज्ञान-विज्ञान हे या मातीचेच उपज आहे, परंतु कृत्रिमता आयुष्यावर इतकी स्वार झाली आहे की या नव्या विचारांनी निसर्गापासून आपल्याला दूर नेलं, असं मला फार वाटतं. आपण मातीचा इतका दु:स्वास का करतो? ज्या मातीतून आपण तयार झालो तिच्यात खेळण्यापासून मुलांना अडवायचं कशाला? वास्तवात मातीच तर जीवनाचं मर्म सांगते, जगण्याचा अनुभव देते.सुप्रसिद्ध कवी शिवमंगल सिंह लिहितात निर्मम कुम्हारकी थापीसे कितनी रुपोमें कुटी पिटी हरबार बिखेरी गयी, किंतु मिट्टी फिर भी तो नही मिटी - हेच अखेर जीवनाचं सार नाही का?कुंभारावरून मला आठवलं, लहानपणी मातीच्या भांड्यात शिजवलेलं वरण आणि भाजी किंवा मातीच्या तव्यावर भाजलेल्या पोळ्या किती छान लागायच्या! त्या चवदार अन्नाला एक तृप्त करणारा सुगंध असे.. त्या आठवणींनी मी इतका बेचैन झालो, की मागच्याच महिन्यात मातीच्या भांड्यांचा एक संच स्वयंपाक घरात आणवून घेतला. त्या दिवशी घरातलं सगळं अन्न मातीच्या भांड्यात शिजवून मातीच्याच भांड्यात वाढलं गेलं. ज्या निकटवर्तीयांना जेवायला बोलावलं होतं, ते सारे या अनोख्या लज्जतदार स्वादानं भारावून गेले. मीही खूप दिवसांनी असा स्वाद चाखला. मातीची भांडी आता वापरातून बाद होताना दिसतात, ही फार मोठ्या दुर्दैवाची गोष्ट!  पूर्वी रेल्वेत किंवा शहरातल्या टपरीवरही मातीच्या कुल्हडमधून चहा मिळायचा... पण आता तो भूतकाळ झाला. कोलकात्यात मात्र आजही मातीच्या भांड्यात विरजलेलं घट्ट कवडीचं दही मिळतं. कोलकात्याला गेलो, की दरवेळी हे मातीच्या भांड्यातलं गोड दही खायला मी विसरत नाही. श्रीमंत घरातल्या खानदानी चांदीच्या भांड्यात जेवण्यातही हे सुख नाही ! ... सोन्या- चांदीची ताटं तो वेडावणारा मातीचा सुगंध कोठून उत्पन्न करणार?वास्तविक भावनांचा आधार घेत जगणारी माणसं, आध्यात्मिकतेच्या अधिक निकट  असणारी... निसर्गाबरोबर जगू पाहणारी लोभस माणसं कोणत्या ना कोणत्या रूपात मातीशी नातं जपू पाहतात. कारण आपण सर्वअखेरीस माती आहोत आणि मातीतच मिसळून जाणार आहोत; या सत्याची विनम्र जाण त्यांना असते. ग.दि. माडगूळकर लिहितात ते खरंच! माती, पाणी, उजेड आणि वारा, अशा सगळ्या पसाऱ्यातून ईश्वराने आपल्या देहांना आकार दिला. मातीमधून आपण अस्तित्वात आलो... एक दिवस तिच्यातच मिसळायचं आहे... कोणी राख होऊन मातीत मिसळेल, कोणी मातीच्या कुशीत दफन होईल... मग त्याच मातीतून पुन्हा नवं सृजन होईल!इंदिरा संत त्यांच्या एका कवितेत म्हणतात,रक्तामध्ये ओढ मातीची,मनास मातीचे ताजेपण,मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन !अखेरीस मातीत मिसळून जाणार असलेल्या या अधुऱ्या जीवनात खरं  ऋण मानावं तेही मातीचंच! जीवनाचं नवं गाणं ऐकवण्याची आणि सृजनाचा संसार उभा करण्याची क्षमता केवळ आणि केवळ मातीतच तर  असते. विज्ञानानं प्रगती पुष्कळ केली. ज्या ज्या ग्रहांवर विज्ञानाच्या मदतीनं आपण पोहोचलो तिथं इथल्यासारखी माती नाही... माती नाही म्हणून जीवन नाही. बीज पडल्याबरोबर आमच्या धरतीला नवसंजीवनी प्राप्त होते. धान्य उगवतं; जे आपल्या जीवनऊर्जेचा आधार आहे. आमचे नैसर्गिक खेळही या मातीतूनच जन्माला आले आहेत, जे आपल्याला ऊर्जा देतात. आपली माती ऊर्जेचे भांडार आहे. आपली पृथ्वी, आपला देश, आपल्या गावाच्या मातीतच स्वर्ग दडलेला असतो, तो म्हणूनच!

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाRamnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत