शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 20:26 IST

Atal Bihari Vajpayee Death: विश्वव्यापी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजोद्धारक आणि तारक कसे आहेत याचे दर्शन भारतवासीयांना घडले. उत्तम राजकारणी, फर्डे वक्ते,  कवी, लेखक आणि विचारवंत  असणा-या अटलजींनी विज्ञान भवनात तुकाराम दर्शन घडविले.

-  विश्वास मोरे

दिल्लीतील विज्ञान भवनात दिनांक ६ फेब्रुवारी २००३ अर्थात वसंत पंचमीचा दिवस. मराठी जणांसाठी अभिमानाचा आणि भाग्याचा दिन अर्थात वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा नाणे प्रकाशन सोहळा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत रंगला. विश्वव्यापी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजोद्धारक आणि तारक कसे आहेत याचे दर्शन भारतवासीयांना घडले. उत्तम राजकारणी, फर्डे वक्ते,  कवी, लेखक आणि विचारवंत  असणा-या अटलजींनी विज्ञान भवनात तुकाराम दर्शन घडविले. महाराष्ट्रातील वारकरी संस्कृतीचे दर्शन घडले. अवघा भक्तीरंग गहिरा झाला. वारकरी संप्रदायाचे पायिक अर्थात तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रयत्नातून २००३ मध्ये वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ तुकाराम महाराज नाणे प्रकाशन सोहळा दिल्लीत झाला. विज्ञान भवनात प्रथमच वारकरी तत्त्वज्ञान आणि  संगीताचे सूर उमटले. वारक-यांना दिल्लीवारी घडविण्याचे पुण्य विखे पाटलांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने केले होते. वसंत पंचमीचा दिवस उजाडला. हा दिवस मराठी जणांसाठी अलौकिक आनंदाचा ठरला. विज्ञान भवनात नाणे प्रकाशन समारंभ सुरू झाला. प्रारंभी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची अभंगवाणी सादर झाली. 'जय जय रामकृष्ण हरी...' या बीजमंत्राने वातावरणात रंग भरला. त्यानंतर 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी...', असे एकाहून एक सरस अभंगरचना सादर केल्या. अभंगवाणी रंगत असतानाच मुख्य सोहळ्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्या वेळी पंतप्रधानांची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. त्याचवेळी 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ...' असे वाजपेयी यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सोहळा सुरू झाला, व्यासपीठावर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बाळासाहेब विखे पाटील, केंद्रीय मंत्री जसवंत सिंह, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात अटलजींचे सुमारे ३२ मिनिटांचे भाषण झाले. त्यातून एखाद्या संतसाहित्याच्या अभ्यासकालाही ज्ञात नसतील, एवढी तुकोबारायांची रूपे उलगडली. तुकोबाराय समाजमनाशी किती एकरूप झाले आहेत, हे सांगितले. भाषण हे हिंदीत असले तरी तुकोबारायांच्या अभंगांचे दाखले देत विवेचन केले. अटलजींनी आपल्या अर्थपूर्ण, अभ्यासपूर्ण रसाळ वाणीने मंत्रमुग्ध करून सोडले़ सभागृह भारावले होते, प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता. अभंगांचे दाखले देत भारत-पाक संबंध, स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण आदी विषयांवर भाष्य करून तुकाराम दर्शन घडविले.  'महाराष्ट्रातील समस्त वारक-यांना माझा नमस्कार, ज्ञानोबा-तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...', असे म्हणून अटलजींनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले,'' महाराष्ट्र ही संतांची भूमी. संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. अभंगरचना, ओव्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. कडक प्रहारही केला. डोळ्यांत अंजण घातले. ' भेदाभेद भ्रम अमंगळ, 'एकमेका साह्य करूं अवघें धरू सुपंथ...' हा बंधू भावाचा विश्वव्यापकतेचा संदेशही तुकोबारायांनीच दिला. झाडे लावा झाडे जगवा आज आपण सांगतो, त्यासाठी अभियान राबविले जाते. परंतु 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी...' हे तुकोबारायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. आपल्यावर कोणी अन्याय करीत असेल, अत्याचार करीत असेल, आपल्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणीत असेल, हिरावून घेत असेल  त्यावरही उपाय तुकोबारायांनीच दिला आहे. ' भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणो काठी' त्यामुळे आम्ही होऊन कोणाच्या वाटेला जाणार नाही. पण नाठाळ असतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. नाठाळाच्या माथी काठीच हाणा, असे आपल्या संतांनीच आपल्याला सांगितले आहे. संतांचे विचार प्रत्यक्षात आणण्याची गरज भासू नये याचे भान भारतावर हल्ले करणा-यांनी ठेवायला हवे. तुकोबारायांच्या वचनांचे दाखले देत तुकाराम दर्शन घडविले. सरते शेवटी श्रीक्षेत्र देहू-आळंदी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा कार्यक्रम जाहीर केला. आज महाराष्टÑात तीर्थक्षेत्रांचा विकास झाला आहे, त्याची सुरुवात अटलजींनीच केली होती. अटलजींचे तुकाराम दर्शन आणि संतांविषयी व्यक्त केलेला प्रेमभाव, ऋण मराठी जणांच्या चिरस्मरणात राहणार आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी