शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 08:59 IST

मुळात वाढणारी महागाई कोणत्याही प्रकारच्या महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती जास्त असते.

- ॲड. कांतीलाल तातेड (अर्थशास्त्राचे अभ्यासक)स्टेट बँक ऑफ इंडिया १० कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवर २.७० टक्के, तर १० कोटी रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवर ३ टक्के दराने व्याज देत असे; परंतु १५ जूनपासून स्टेट बँकेने सर्व बचत खात्यांवरील व्याजदर २.५० टक्के केला आहे. एचडीएफसी बँकेमागोमाग इतर बँकाही बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

देशातील सर्व बँकांतील बचत खात्यांमध्ये ७० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा असून त्यापैकी २० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम महिलांच्या बचत खात्यात जमा आहे. मे २०२५ मध्ये किरकोळ महागाईचा दर २.८२ टक्के होता. तर बचत खात्यावर मिळणारे व्याज महागाईच्या दरापेक्षाही कमी आहे. हे योग्य आहे का?

गरिबातल्या गरिबाने भविष्यासाठी थोडी-थोडी का होईना बचत करावी, यासाठी बचतीवर आकर्षक व्याज देऊन घरगुती बचतीचे प्रमाण वाढवावे हा बचत खाती सुरू करण्यामागचा मूळ उद्देश. २० ऑगस्ट, १९९३ पूर्वी बचत खात्यावर ६ टक्के दराने व्याज दिले जात होते. आता मात्र उद्योगपतींना स्वस्त दराने कर्जे मिळावीत, बँकांच्या नफ्यात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश झाला आहे.

वाढणारी महागाई, रुपयाचा होणारा मूल्यऱ्हास यांसारख्या आर्थिक निकषांच्या आधारे व्याजदर निर्धारित करणे आवश्यक असते. वाढत्या महागाईमुळे गुंतवणुकीचे वास्तव मूल्य वेगाने कमी झाल्याने गुंतवणूक करण्यामागील मूळ हेतूच विफल होतो. व्याजदर निश्चित करताना गुंतवणूक योजनेचा मूळ उद्देशही लक्षात घेणे आवश्यक असते. आपल्या देशात गुंतवणुकीपासून मिळणारे व्याजाचे उत्पन्न हेच कोट्यवधी लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते, हेही येथे महत्त्वाचे. 

२०२५ चा किरकोळ महागाईचा निर्देशांक २.८२ टक्के आहे.  बचत खात्याचे व्याजदर  त्यापेक्षा जास्त असावयास हवेत; परंतु स्टेट बँकेने उलट त्यात कपात केली आहे. प्राप्तिकराचा विचार केला तर १० टक्क्यांच्या टप्प्यात करपात्र उत्पन्न असणाऱ्या गुंतवणूकदारांना २.२४ टक्के, २० टक्क्यांच्या टप्प्यात असणाऱ्यांना १.९८ टक्के, तर ३० टक्क्यांच्या टप्प्यातील गुंतवणूकदारांना १.७२ टक्केच व्याजदर पडतो. त्यामुळे  बचत खात्यातील गुंतवणुकीवर उत्पन्न तर सोडाच, प्रत्यक्षात मुद्दलातच मोठ्या प्रमाणात घट होत असते.

‘आजकी बचत, कलका उजाला’ असे म्हणतात. प्रत्यक्षात मुद्दलातच वेगाने होणारी घट पाहता ‘आजकी बचत, कलका अंधेराही अंधेरा’ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुळात वाढणारी महागाई कोणत्याही प्रकारच्या महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती जास्त असते. महागाईचा दर २.८२ झाला याचा अर्थ महागाई कमी झाली असा नव्हे, तर महागाई वाढण्याचा वेग त्या महिन्यात कमी झालेला असतो. उदा. एप्रिल १९८७ मध्ये बचत खात्यावर ६ टक्के व्याज मिळत होते. त्यावेळी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ६९१ होता. आता मार्च २०२५ मध्ये तो ९४००.६२ इतका आहे. म्हणजेच केवळ महागाई निर्देशांकाचा विचार केला तरी या कालावधीत महागाईमध्ये १३.६० पटींनी वाढ झालेली आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला या आधारावर गुंतवणुकीवरील व्याजदर कमी करणे अन्यायकारक असते. त्यामुळे महागाईचा दर जर २.८२ टक्के आहे. तर बचत खात्यातील गुंतवणुकीच्या व्याजदरात कपात करून ते २.५०टक्के करणे अन्यायकारकच आहे.kantilaltated@gmail.com

टॅग्स :bankबँकInvestmentगुंतवणूकBanking Sectorबँकिंग क्षेत्रReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक