शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लेख: काय चाललंय काय, फक्त फॉग चाललंय...

By अतुल कुलकर्णी | Updated: November 30, 2025 11:45 IST

'भांडा सौख्यभरे' या न्यायाने भाजप आणि शिंदेसेना यांची प्रचार सभांमधून सुरू असलेली भांडणे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेपेक्षा भारी आहेत.

- अतुल कुलकर्णी संपादक, मुंबईस्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या नेत्यांनो, तुम्ही दाखवत असलेल्या चमत्काराबद्दल आणि तो पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या मतदारांनो, तुम्हा दोघांनाही मनापासून नमस्कार.महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. 'भांडा सौख्यभरे' या न्यायाने भाजप आणि शिंदेसेना यांची प्रचार सभांमधून सुरू असलेली भांडणे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेपेक्षा भारी आहेत. अजितदादा म्हणतात, 'मत देणं तुमच्या हातात, तर निधी देणं माझ्या हातात आहे...' एकनाथ शिंदे म्हणतात, 'नगर विकास खात्याचा मी प्रमुख आहे. कुणाला काय द्यायचं, ते मी ठरवीन...' तर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, 'तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही असू द्या. तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे...' तिकडे जळगावात गुलाबराव पाटील म्हणाले, 'एक तारखेच्या रात्री बाहेर झोपा. लक्ष्मी तुमच्याकडे दर्शन द्यायला येणार आहे...' 

भाजप आ. तानाजी मुटकुळे यांनी शिंदेसेनेचे आ. संतोष बांगर यांनी पन्नास खोके घेतल्याचा आरोप खरा असल्याचे सांगून टाकले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे... जेवढ्या सभ्य गोष्टी लिहिता येतील तेवढ्याच इथे नमूद केल्या आहेत. बाकी 'भ'च्या बाराखडीत जे-जे शब्द बसू शकतात... किंवा एकमेकांच्या पिढ्यांचा उद्धार करण्यासाठीचे शब्द बोलण्याची हिंमत त्यांच्यात असली तरी ते लिहिण्याची हिंमत आमच्यात अजून आलेली नाही.

काहीही असो, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...? असा प्रश्न ज्यांना कुणाला पडला असेल, त्यांना सुसंस्कृत, सहिष्णू, देशाला दिशा देणारा, हाच तो महाराष्ट्र, याची खात्री पटली असेल. भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या नेत्यांनी प्रचाराच्या माध्यमातून स्वतःची आणि महाराष्ट्राची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. यशवंतरावांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त करण्याचीही आता तशी गरज उरलेली नाही. काय अस्तित्व करायचे ठरवले, तर महाराष्ट्रातले सगळे नेते तिथे नेऊन बसवावे लागतील; पण त्याची तशी गरज आता ना नेत्यांना वाटत आहे ना मतदारांना... असो.

हळूहळू लोप पावत चाललेला आणि हल्ली दुर्बीण लावून शोधावा लागणारा काँग्रेस नावाचा पक्ष तुम्हाला कुठे सापडला, तर त्याला बोटाला धरून परत महाराष्ट्रात घेऊन या... घरातले लहान मूल रागावून न सांगता निघून गेले की, पूर्वी पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातीत 'तुला कोणी रागवणार नाही... तुला काही बोलणार नाही... तुला चांगला शर्ट घेऊन देतो... सिनेमाला नेतो... आइस्क्रीम देतो... तू लवकरात लवकर घरी ये. आई तुझी खूप आठवण काढत आहे. तुझ्यावर प्रेम करणारे चिंटू मिंटू पिंटू...' असे लिहिलेले असायचे. 

गेले काही दिवस काँग्रेस कुठे सापडत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी वर्गणी गोळा करून अशी जाहिरात द्यायला हरकत नाही. जो कोणी या पक्षाला बोटाला धरून मुंबईत घेऊन येईल... महाराष्ट्रात तो कुठे आणि कसा सापडला याची गोष्ट सांगेल, त्याला आपण चौपाटीवर फिरायला घेऊन जाऊ.... तिथल्या यूपी, बिहारी भय्याकडून भेळ, पाणीपुरी खाऊ घालू.. येईल... महाराष्ट्रात तो कुठे आणि कसा सापडला.

राज आणि उद्धव. दो बिछड़े भाई एकमेकांना अनेक वर्षानंतर भेटले. त्यामुळे दोघेही एकमेकांची आठवण आली की, लगेच एकमेकांच्या घरी जात आहेत. त्यांच्या एकमेकांच्या भेटींचे उमाळे संपले की, मग ते मतदारांकडे निश्चितपणे जातील. तोपर्यंत आपण त्यांच्यासाठीचे मत राखून ठेवायला हवे. नगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणुका झाल्या तर झाल्या... आणखी बऱ्याच निवडणुका बाकी आहेत... निवडणुका संपल्या, तर पुन्हा येतील... पण दोन बंधू मराठीसाठी एकत्र आले, हे जास्त महत्त्वाचे बंधू मराठीसाठी एकत्र आले, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यातली जी कोणती शेवटची निवडणूक होईल त्यासाठी मराठी माणसे स्वतःचे मत राखून ठेवतील, हे नक्की....

निवडणुका खरे तर लोकसभेच्या गल्लीबोळांतले रस्ते, पाणी, ड्रेनेज या विषयावर व्हायला हव्यात. विधानसभेच्या निवडणुका ट्रम्प तात्यांना किती कळते किंवा किती कळत नाही, यावर व्हाव्यात आणि पालिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जातीच्या, धर्माच्या नावावर झाल्या पाहिजेत. सगळ्या नेत्यांनी आमच्या बालबुद्धीला सुचलेला हा प्रस्ताव नक्की विचारात घ्यायला हवा. म्हणजे 'कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...?' असा प्रश्न कोणालाही पडणार नाही... सर्व उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा आणि पराभुतांचे आतापासूनच सांत्वन...तुमचाच, बाबूराव

English
हिंदी सारांश
Web Title : Not What's Happening, Only Fog is Happening: Political Satire

Web Summary : Maharashtra's political landscape is a spectacle with leaders making bold claims. Alliances shift, promises fly, and the common man is left bewildered. The author satirically observes the state of affairs, questioning the moral compass of leadership and yearning for the return of principled politics.
टॅग्स :MahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे