शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

By shrimant mane | Updated: September 23, 2025 07:00 IST

हस्तांदोलन न करणे हा क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा असभ्यपणा असेल तर स्टेनगनसारखी बॅट उलटी धरून गोळीबाराचे हावभाव करणे हा कोणता सभ्यपणा?

श्रीमंत माने,  संपादक, लोकमत, नागपूर

साहिबजादा फरहान नावाच्या पाक क्रिकेटपटूने रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक साजरे करताना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील भारतीय प्रेक्षकांना खिजवले आणि हातातील बॅट स्टेनगनसारखी पकडून जे गोळीबाराचे हावभाव केले, ते तळपायाची आग मस्तकात नेणारे आहेत.

पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे २६ निरपराधांचे जीव घेतल्याच्या वेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम असताना दोन्ही देशांमध्ये हे सामने खेळले जात आहेत.  किमान माणूस म्हणून तरी दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांच्या रक्तरंजित व्यथा, दु:ख समजून घेऊन अधिक जबाबदारीने वागण्याची, आपले बोलणे-चालणे किमान संवेदनशील ठेवण्याची गरज असताना हा मस्तीखोर क्रिकेटपटू पहलगामच्या निरपराध बळींची खिल्ली उडवतो. हरिस रऊफ नावाचा आणखी एक खेळाडू सीमारेषेवर प्रेक्षकांना खिजवताना हाताने विमान पाडल्याचे हावभाव करतो, हे सारे अत्यंत संतापजनक आहे. याच रऊफला शुभमन गिलने सणसणीत चाैकार मारला तेव्हा त्याने गिलला उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरली. ती ऐकल्यानंतर नाॅन-स्ट्राइकच्या अभिषेक शर्माने त्याला जाब विचारला. मैदानावर अशी हमरातुमरी चालतच असते. पण, फरहान व रऊफचे हावभाव अजिबात सहन करण्यासारखे नाहीत. अंगावर सैनिकी गणवेश  घालणारे जवान असोत, की खेळाडू, बहुतेक पाकिस्तानी लोकांच्या अंगातील मस्ती कमी होण्याची चिन्हे नाहीत. तशी शक्यताही नाही. त्याचे कारण स्पष्ट आहे, दहशतवादी व हिंसक मानसिकता हीच पाकिस्तानची ओळख आहे. दहशतवादी कृत्ये, निरपराधांचे बळी, रक्तपात हे सारे त्यातूनच येते आणि ‘असे करणे म्हणजेच आपण पाकिस्तानी’ असे हे लोक समजत असावेत. 

याच आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीवेळी हस्तांदोलन केले नाही म्हणून पाकिस्तानने कितीतरी फडफड केली. इंटरनॅशनल क्रिकेट काैन्सिलकडे निषेध नोंदविला. सामनाधिकारी ॲण्डी पायक्राॅफ्टविरुद्ध तक्रार केली. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला जाईल असे वातावरण तयार केले. तो सामना उशिरा सुरू केला. आयसीसीने दांडके उगारताच पाक क्रिकेट बोर्डाने नांगी टाकली. दुसऱ्या सामन्यातही पायक्राॅफ्ट हेच सामनाधिकारी म्हणून स्वीकारावे लागले. हस्तांदोलन न करणे हा सभ्य लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा असभ्यपणा असेल तर स्टेनगनसारखी बॅट उलटी धरून गोळीबाराचे हावभाव करणे हा कोणता सभ्यपणा आहे, हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पीसीबीला खडसावून विचारायला हवा. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापनाने याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट काैन्सिलकडे तक्रार केल्याची बातमी अजून तरी नाही. नियम म्हणून पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळावा लागणारच अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. भारत व पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटात टाकता आले नसते का या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. याहून महत्त्वाचे हे की, खरा देशाभिमान, देशवासीयांच्या प्राणांचे मोल वगैरेंच्या आघाडीवर आपण भारतीय मुळातच कमालीचे लेचेपेचे, बोटचेपे, नेभळट आणि झालेच तर ढोंगी व भंपक आहोत.

गेली जवळपास ऐंशी वर्षे हा शेजारी देश आपल्याला अतोनात त्रास देतो आहे. भारतात शांतता नांदूच नये यासाठी संधी मिळेल तेव्हा छुपे व उघड हल्ले करतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी घुसवतो आहे. रक्ताचे पाट वाहवतो आहे आणि आपण भारतवासी मात्र खेळाच्या सामन्यात सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले म्हणून चाैकाचाैकात जमा होऊन जल्लोष करतो आहोत. दहशतवादाविरोधातील युद्ध सोशल मीडियावर खेळतो आहोत. शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्या बाउन्सरवर मारलेला षटकार नूरखान बेग तळावर पडला असे दाखविणारे फोटोशाॅप करून टाळ्या वाजवतो आहोत. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने केलेली काहीतरी टिप्पणी हे साहिबजादा फरहानच्या गुन्हेगारीसदृश कृतीला उत्तर असल्याचे सांगत फसवे समाधान करून घेतो आहोत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कळत-नकळत पहलगाममधील निष्पापांच्या बळींची तुलना क्रिकेटमधील बळींशी करून आपणही जणू देशविरोधी मानसिकतेचेच प्रदर्शन करीत आहोत. खरे देशप्रेम व त्यासाठी पडेल ती किंमत माेजण्याच्या तयारीचा विचार केला तर इतके तकलादू व दांभिक देशप्रेम जगात अन्यत्र अपवादानेदेखील सापडणार नाही. सारासार विचार करण्याची क्षमता, सद्सद्विवेक गमावून बसण्याइतपत आपला मेंदू, जाणिवा कशाने भणाणून गेल्या आहेत आणि आपण इतके बधिर का झालो आहोत?     shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान