शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

लेख: राजकारणात निष्ठा वगैरे काही नसते रे, भाऊ! सत्तेच्या समीकरणांत सगळं भाषणापुरतंच!

By यदू जोशी | Updated: January 23, 2026 07:25 IST

अंकगणितच अंतिम सत्य ठरते. निकालानंतरच्या चिखलात सध्या हे एकच सत्य मागे उरले आहे!

यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत

महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व २९ शहरांमध्ये कोण महापौर होणार याचे अंदाज वर्तविणे सुरू झाले आहे. गेल्या दोन-चार दिवसांत माध्यमांनी भरपूर पतंगबाजी केली. अनुसूचित जमातीचा नगरसेवकच भाजप-शिंदेसेनेकडे नाही, त्यामुळे बहुमत त्यांचे असले तरी महापौरपद उद्धवसेनेकडे जाणार इथपर्यंत पतंगबाजी करून झाली. आत्मविश्वासाने भाकिते वर्तविली गेली. मात्र, आधी आकाशात झुलणाऱ्या पुड्या सोडतीनंतर कचराकुंडीत गेल्या. सोडत निवडणुकीच्या आधी घ्यावी, असा कोणताही नियम नाही. अन् आधी सोडत केली असती तर ज्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव आहे तिथे पाडापाडीचे पक्षांतर्गत राजकारण झाले असते. बंडखोरीही झाली असती. अमूक एका वर्गासाठी पद राखीव आहे म्हटल्यानंतर इतर प्रवर्ग मतदानाबाबतही उदासीन राहू शकतात. सोडत कधी काढायची हे नगरविकास विभागाच्या म्हणजे सरकारच्या हाती असल्याने निकालानंतरची तारीख ठरविली गेली हे उघड आहे.

निकालानंतरची एक वेगळीच निवडणूक सध्या दिसते आहे. निष्ठावंतांच्या मांडवातून काही जण कालपर्यंत ज्यांना गद्दार म्हटले त्यांच्या मांडवात दाखल होताना दिसत आहेत. नगरसेवकांची, त्यांच्या निष्ठेची आणि त्यांच्या किमतीचीही निवडणूक सध्या चालली आहे. आधी मतदारांनी उमेदवारांचे मूल्यांकन केले, आता त्यांच्या किमतीची बोली लागली आहे. कालपर्यंत ज्या मांडवात निष्ठा, तत्त्वनिष्ठेची भाषणे रंगत होती, त्याच मांडवाला गळती लागली आहे.

२०१७ मध्ये जिंकलेले राज ठाकरे यांचे सात नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पळविले होते. आता कल्याण-डोंबिवली व इतर ठिकाणीही या दोघांचे नगरसेवक एकनाथ शिंदे पळवत आहेत. राजकारणात सूड हा चक्राकार असतो; आज जो पळवतो; उद्या तो पळविला जातो. काही वर्षांनंतर ही वेळ भाजपवर येऊ शकेल. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली होती, पण त्यांच्या आणि राज यांच्या भरवश्यावर निवडून आलेले नगरसेवक चारच दिवसात साथ सोडून जात आहेत. खरेतर या दोन भावांचा भाजपइतकाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्तच शत्रू म्हणजे एकनाथ शिंदे पण त्याच शिंदेंच्या पक्षाला महापौरपद मिळावे यासाठी दोन्ही पक्षांचे नगरसेवक त्यांच्या तंबूत दाखल होत आहेत. चंद्रपूर, अमरावती, अकोल्यात भाजपकडून उद्धवसेनेचे नगरसेवक ओढले जात आहेत. आपले नगरसेवक ठाकरे यांना सांभाळून ठेवता येत नाहीत, असे दिसते. आज चार-आठ लोक गेले, पुढे आणखी गळती लागू शकते. ‘स्थानिक राजकारणाचा विचार करून आमच्या नगरसेवकांनी निर्णय घेतला असेल, त्यांचा निर्णय ही आमच्या पक्षाची भूमिका नाही’, ही मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया तर निष्ठेलाही चक्रावून टाकणारी आहे. 

सत्तेच्या समीकरणांत निष्ठा केवळ भाषणापुरती उरते आणि निर्णायक क्षणी अंकगणितच अंतिम सत्य ठरते. उद्धवसेनेच्या नगरसेवकांना तर रात्रीतून शत्रू लोभस मित्र वाटू लागले आहेत. नगरसेवकांची निष्ठा इतकी तकलादू का असते? पक्ष म्हणजे वाहन आणि सत्ता म्हणजे त्या वाहनाने गाठावयाचे ठिकाण असे गृहित धरले तर चालक (नगरसेवक) दिशा बदलतो. विचारसरणी ही प्रचारासाठी वापरायची भाषा ठरते. प्रत्यक्ष प्रवास मात्र सत्तेकडेच असतो.

तावडेंची कठीण परीक्षा

केरळमध्ये चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केरळमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. वाळूचे कण रगडून तेल काढण्याचे काम तावडेंकडे दिले आहे. चांगले काम करणाऱ्याला अधिक काम दिले जाते, तसे तावडेंबाबत झाले आहे. ते बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस आहेत, तिथे भाजप-जदयु युती पुन्हा सत्तेत आली. तावडेंनी पडद्यामागे, पडद्यासमोर खूप काही केले. आता केरळमध्ये कमळ फुलवायची जबाबदारी या मराठी नेत्याकडे सोपविली आहे. आधी तावडे दिल्लीत रमले होते, आता जमले आहेत.

असे आहेत नितीन नबीन

नितीन नबीन किती पारदर्शकपणे काम करतात याचा एक किस्सा परवा दिल्लीतील एका नेत्यानेच सांगितला. बिहारचे सर्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या खात्यामार्फत सहाशे कोटी रुपयांची कामे करावयाची होती. ती कामे कोणकोणती आहेत, प्रत्येक कामाची किंमत किती आहे, त्याची निविदा प्रक्रिया कशी पारदर्शकपणे राबविली जाणार आहे आणि त्यात आपला स्वत:चा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही, असा सगळा अहवाल नितीन नबीन यांनी आधीच पक्षनेतृत्वाला देऊन टाकला. आता त्याच नितीन नबीन यांनी देशभरातील भाजपच्या मंत्र्यांसाठी आचारसंहिता आणली तर अनेकांची पंचाईत होवू शकते...

जाता जाता : अजित पवार यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी (अ.प.), राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे तर शरद पवार यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी (श.प.), राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमांमधून लिहून येते. अजितदादा, संपवून टाका एकदाचा गोंधळ. पूर्वीसारखे एकच राष्ट्रवादी काँग्रेस असे नाव लिहून येईल. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असे राज ठाकरेंच्या साक्षीने उद्धव ठाकरे म्हणाले होते. तुम्ही पुतणे-काका एकत्र आला आहातच, एक होणे तेवढे बाकी आहे.

yadu.joshi@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Politics: Loyalty is an Illusion, Power Equations Trump All!

Web Summary : Post-election, shifting loyalties dominate Maharashtra politics. Corporators switch sides for power, exposing the hollowness of ideological commitment. Turf wars intensify between parties, highlighting the supremacy of political arithmetic over principles.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६