शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 08:28 IST

केंद्रीय सतर्कता आयोगाच्या वतीने दिनांक २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान संपूर्ण देशात भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह पाळण्यात येत आहे. त्यानिमित्ताने...

प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र

केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर यादरम्यान संपूर्ण देशात भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज सक्षम होण्यासाठी सप्ताह पाळण्यात येत आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या  सर्व संबंधितांना एकत्र आणून जनप्रबोधन करणे व भ्रष्टाचारामुळे पीडित असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना दिलासा देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. शासन कारभारात व सामान्य प्रशासनात नैतिकता व पारदर्शीपणाचे महत्त्व याबद्दल अधिक संवेदनशीलता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यावर्षी ‘देशाचा विकास सत्यनिष्ठेच्या संस्कृतीवर अवलंबून असतो’ या बोधवाक्यावर हा सप्ताह आधारित आहे. 

जनप्रबोधनासाठी आकाशवाणी, दूरदर्शन, सामाजिक माध्यमे, वर्तमानपत्रे अशा अनेक माध्यमांचा वापर होतो. शिवाय  प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेर अँटी करप्शन ब्यूरो कार्यालयाचे संपर्क क्रमांक ठळकपणे लावले जातात. सामान्य नागरिकालाही सहजपणे भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करता यावी यासाठी महाराष्ट्र अँटी  करप्शन ब्यूरोने www.acbmaharashtra.net हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या माध्यमातून कोणीही तक्रार किंवा माहिती कार्यालयाला कळवू शकतो. याशिवाय, १०६४ हा टोल फ्री क्रमांक चोवीस तास सुरू असतो.

कोणत्याही अपवादाशिवाय प्रशासनाच्या सर्व विभागांमध्ये, तसेच कायदेशीर मोबदल्याव्यतिरिक्त पैसे, महागड्या वस्तू, शारीरिक सुखाची मागणी करणे तसेच या गोष्टी स्वतः किंवा अन्य व्यक्तीमार्फत स्वीकारणे म्हणजे भ्रष्टाचार आहे व हे करणे कायद्याने गुन्हा आहे. भ्रष्टाचाराचे मुख्य कारण ‘हाव’ हेच आहे. सध्या सर्व लोकसेवकांना मिळणारा पगार हा घसघशीत असतो व त्यावर त्या व्यक्तीचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह ठीक चालू शकतो. ‘मी लाच देणार नाही व घेणार नाही’, अशी प्रतिज्ञा करूनही लोकसेवक भ्रष्टाचार करताना दिसतात, कारण सध्याच्या न्यायप्रक्रियेत हे खटले कित्येक वर्षे प्रलंबित राहतात. तोपर्यंत तक्रारदार कंटाळून जातो.ज्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध लाचेची मागणी करणे किंवा लाच स्वीकारणे असे आरोप असतील त्या अधिकाऱ्याला नेमणाऱ्या व्यक्तीची खटला चालवण्यासाठी मान्यता आवश्यक असते. 

लोकसेवक रंगेहाथ पकडला जातो व तपास करण्यासाठी सदर व्यक्तीस नेमणाऱ्या  शासकीय अधिकाऱ्याकडून मान्यता मिळावी म्हणून अहवाल पाठविला जातो त्यावेळेस नेमणारा अधिकारी मान्यता देण्यास फार मोठा विलंब करतो व काही वेळा मान्यता नाकारतो. लोकसेवक लाचेची मागणी करतो किंवा लाच स्वीकारतो, त्यावेळेस त्याने प्रशासकीय कामात हलगर्जीपणा केला या कारणासाठी त्वरित विभागीय चौकशी सुरू करून ती ठराविक मुदतीत वेगाने पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात विभागीय कारवाई सुरू केली जात नाही, आरोपी लोकसेवकास निलंबित केले जात नाही, त्यामुळे तक्रार करणाऱ्याचे धैर्य कमी होते व लाचखोर निर्ढावून पीडित, शोषित, वंचित, सामान्य व्यक्तींवर जुलूम करत राहतो.

वाढत्या लाचलुचपतीच्या घटनांना परिणामकारक प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकारने २०१८ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ लागू केला. सदर अधिनियमाप्रमाणे आपला व्यवसाय वाढावा यासाठी ज्या व्यापारी संस्था किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या  व्यक्ती शासकीय सेवकास कोणतेही आमिष दाखवतील त्या शिक्षेस पात्र होतील अशी तरतूद करण्यात आली. लाचखोर लोकसेवकाची नेमणूक करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याने संबंधित आरोपीने प्रथमदर्शी प्रशासकीय गैरव्यवहार केला आहे काय, एवढेच तपासून पाहायचे असते. स्वतःच न्यायाधीश असल्याप्रमाणे त्याने पुराव्यांची तपासणी करू नये असे आदेश असतानाही अनेक घटनांमध्ये संबंधित अधिकारी खटला चालविण्यास मान्यता देत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेची ही तरतूद रद्द करण्यात यावी यासाठी विधि आयोगाने वारंवार आग्रह धरला आहे.

भ्रष्टाचार ही न संपणारी कीड आहे. स्वतःचे काम लवकर व्हावे म्हणून लोकांनीही भ्रष्टाचारास प्रोत्साहन देऊ नये. तसेच कोणीही लोकसेवक कायदेशीर मोबदल्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टींची मागणी करत असेल तर न घाबरता किंवा त्या व्यक्तीशी हुज्जत न घालता www.acbmaharashtra.net या संकेतस्थळावर किंवा १०६४ या टोलफ्री क्रमांकावर ही माहिती कळवावी व न्यायालयीन कारवाई संपेपर्यंत मागे हटू नये, त्यामुळेच भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस