शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लेख: घरात 'या' गोष्टी करा, तरच तुमचे काही खरे असेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:51 IST

पूर्वी खाणे-पिणे घरी व मलमूत्र विसर्जन बाहेर असायचे. आत्ताच्या काळात जागेअभावी अगदी उलट परिस्थिती आहे.

- डॉ. सुहास वामनराव कुलकर्णी (सदस्य, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया)घर असावे आरोग्यदायी, निरोगी प्रत्येक सदस्य, कानाकोपऱ्यातील स्वच्छता, ठरेल जीवजंतूचा कर्दनकाळप्रत्येक कुटुंबासाठी घर हे जसे, शांतता, समाधान, सुख-समृद्धी बहाल करणारे असावे तसेच ते आरोग्यदायीही असावे. हे सहज साध्य होऊ शकते ते घरातील स्वच्छतेमुळे. पूर्वी घरे कुटुंबाप्रमाणे खूपच मोठी होती. पुढील दार, अंगण, ओसरी, घर, माजघर, परसकड, मागील दार असे विज्ञानाधारित विभाजन असे. काळ बदलला तशी कुटुंबाची व्याख्याही बदलली. घरे लहान झाली; पण गरजा अपार वाढल्या.

कुटुंबातील प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात, उदा. झोपेतून उठण्याच्या, जागण्याच्या, झोपण्याच्या, कामाच्या, खाण्यापिण्याच्या, रात्री-अपरात्री घरी येण्या-जाण्याच्या, कपडे परिधानाच्या. हे सर्व सांभाळताना वेळेचा ताळमेळ बसत नाही व त्यातून निर्माण होते घरातील अस्ताव्यस्तता व अस्वछता. त्यामुळे आरोग्य बिघडते. घरातील स्वच्छतेचे सूक्ष्मजीवशास्त्रीय ऑडिट करून घेण्याला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. यात हवा, पाणी, अन्न, वस्त्र व निवारा यांचे विज्ञानाधारित चाचणीयुक्त परीक्षण केले जाते.

पूर्वी खाणे-पिणे घरी व मलमूत्र विसर्जन बाहेर असायचे. आत्ताच्या काळात जागेअभावी अगदी उलट परिस्थिती आहे. अर्थात शौचालये घरात आल्याने त्यापासून होणाऱ्या संसर्गाच्या अगदी जवळ मानव पोहोचला. त्यामुळे 'युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन'च्या केसेस व 'अँटिबायोटिक रेसिस्टन्ट'चे प्रमाण वाढलेले दिसून येते. घरातील बाथरूम व शौचालये ही रोगकारक जंतुविरहित आहेत का? हे तपासणे क्रमप्राप्त आहे. 

घरातील हवा कितपत शुद्ध आहे? धूलिकणांचे, परागकणांचे प्रमाण किती आहे? हे जसे महत्त्वाचे आहे, तसेच घरातील उपकरणांची, स्वयंपाक बनवण्याच्या जागेची, ड्राय बाल्कनीची, बेडरूमची, फरशींची, भिंतींचीही स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. घरातील सदस्य जर वरचेवर आजारी पडत असतील व सर्दी, खोकला, अॅलर्जी, पोटाचे विकार, स्कीन इन्फेक्शनमुळे त्रस्त असतील तर या आजारासाठी कारणीभूत जंतू घरात आहेत, हे नक्की.

या नेमक्या गोष्टी कराव्यात...

नेमाने घराच्या कानाकोपऱ्यातील स्वछता करावी.

घरातील फरशा पुसताना त्यात योग्य प्रमाणात जंतुनाशक आहे, याची खात्री करावी.

पडदे, पांघरुणे ठराविक कालावधीत धूत जावे.

कपाटातील कपड्यांना वारा-ऊन देत जावे.

बाथरूम व टॉयलेट रोज स्वच्छ करावे.

अन्नाचा व धान्याचा साठा टाळावा. ताजे स्वच्छ व शिजवलेल्या अन्नाला प्राधान्य द्यावे.

गरज भासल्यास पेस्ट कंट्रोल करून घ्यावी.

आपल्या आरोग्य बदलाची वेळीच दखल घ्यावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy Home: Essential Hygiene Practices for a Disease-Free Life

Web Summary : Maintain a healthy home by prioritizing cleanliness. Regularly clean all corners, disinfect floors, wash curtains, air clothes, and maintain clean bathrooms. Avoid food storage, eat fresh, and consider pest control for disease prevention.
टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलHomeसुंदर गृहनियोजन