शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस पक्ष कुठे दिसलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 1:25 AM

मला आठवते १९७७ साली निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधींवर सत्तेकडून चौफेर प्रहार करण्यात आले होते. त्या काळात काँग्रेस मोडून पडली होती

मला राजकारण समजू लागले तेव्हापासून आतापर्यंत मी अशी निवडणूक बघितली नाही ज्या निवडणुकीत काँग्रेसने संघर्ष करणे सोडून दिले आहे! महाराष्ट्रात काँग्रेसने यंदाची निवडणूक लढवलीच नाही. काँग्रेसजवळ ना कोणते नियोजन होते, ना कोणता जोम होता. काँग्रेस पक्ष पूर्णपणे हतोत्साह झालेला दिसून आला. वास्तविक याहून वाईट अवस्थेत काँग्रेसने संघर्ष केल्याचा इतिहास आहे.

मला आठवते १९७७ साली निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधींवर सत्तेकडून चौफेर प्रहार करण्यात आले होते. त्या काळात काँग्रेस मोडून पडली होती आणि इंदिराजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची स्थिती खूपच कमकुवत झाली होती, शिवाय काँग्रेसची आर्थिकअवस्थादेखील वाईट होती. साधनसंपत्तीचा अभाव होता. त्याच काळात १९७८ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार होत्या. पण त्या काळात इंदिराजींनी आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी कमालीच्या धैर्याचा आविष्कार दाखवून दिला. त्यांनी झपाटल्यागत साऱ्यामहाराष्ट्रभर दौरा केला, त्यामुळे निवडणुकीचे निकाल चांगले दिसून आले. निवडणुकीनंतर बंडखोर गटासोबत समझोता होऊन वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. पण यावेळच्या निवडणुकीत कुठेही संघर्ष पाहायला मिळाला नाही. काँग्रेसच्या दुर्दशेविषयी मी याच स्तंभातून अनेकदा लेखन केले आहे. माझे मत आहे की, काँग्रेस जर क्रियाशील झाली तर परिस्थितीत बदल होऊ शकतो. गरज आहे ती हिंमत आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा जो माहोल निर्माण केला, त्यामुळे काँग्रेस पक्ष गोंधळून गेला. या तिघांनी काढलेल्या निवडणूक प्रचाराच्या यात्रांमुळे भयभीत होऊन काँग्रेस पक्ष आत्मविश्वास गमावून बसला आणि निवडणुकीत त्याने अगोदरच पराभव मान्यकेला.

वास्तविक सत्तारूढ पक्षातील उणिवांवर बोट ठेवण्याचे काम काँग्रेसला करता आले असते. समाजापुढे आज अनेक ज्वलंत प्रश्नआहेत. अनेक प्रश्न दडलेले आहेत. लोकांमध्ये सत्तारूढ पक्षाविषयी सुप्त असंतोष आहे. त्यामुळे काँग्रेसला आक्रमक पद्धतीने प्रचार करता आला असता, पण तसे घडू शकले नाही. जे काँग्रेसला करता आले नाही ते शरद पवारांनी करून दाखवले. प्रचार करताना त्यांनी उन्हाची पर्वा केली नाही. पावसाची तमा बाळगली नाही. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले आणि शिवाजी महाराजांची तलवार हातात घेऊन एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते निवडणूक रणांगणात उतरले आणि संपूर्ण ताकदीने हल्ले करीत सुटले. त्यांनी साताºयाच्या गादीला हलवून सोडले आणि त्याचा लाभ त्यांना झाला.

याउलट काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवून त्याजागी बाळासाहेब थोरातांना बसवून पाच कार्याध्यक्ष त्यांच्या सोबतीला दिले. त्यांनी निवडणुकीचे योग्य नियोजन करावे, यासाठी हे करण्यात आले. त्यातून काँग्रेस चांगली कामगिरी करू शकेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात हीच माणसे स्वत: निवडणूक लढवीत होती. त्यामुळे ती आपल्या मतदार संघापलीकडे जाऊच शकली नाही. वास्तविक त्यांना पद कशासाठी देण्यात आले होते? विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार, अशोकचव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे मोठे नेते आपल्या मतदारसंघाबाहेर पडलेच नाहीत. ज्यांना स्टार प्रचारक करण्यात आले होते, त्यांनी केवळ स्टार उमेदवारांचाच प्रचार केला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जवळजवळ २०२५ जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराचा दोन- चार हजार मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. तेथे हे स्टार प्रचारक आणि मोठे नेता गेले असते तर हे उमेदवार विजयी होऊ शकले असते. राहुल गांधींच्या एक-दोन सभा जरूर झाल्या. पण काँग्रेसचे इतर मोठे नेते प्रचारासाठी उतरले असते तर चांगले वातावरण निर्माण होऊ शकले असते.

स्वास्थ्याच्या कारणासाठी सोनिया गांधी प्रचारासाठी येऊ शकल्या नाहीत, हे मी समजू शकतो. पण महाराष्ट्रात काही क्षेत्रात प्रियांका गांधी यांचे रोड शो जरी झाले असते तरी २०-२५ जागा अधिक जिंकता आल्या असत्या. काँग्रेसचे दोघे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे हे नागपूरचेच आहेत. पण तेदेखील काही बड्या नेत्यांना प्रचारासाठी आणू शकले नाहीत. इतकेच काय पण विदर्भाचे अनेकदा प्रतिनिधित्व करणारे गुलाम नबी आझाद जरी प्रचारासाठी आले असते तरी खूप फरक पडला असता. याउलट भाजपचे सारे नेते प्राण पणाला लावून निवडणुकीत उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य अनेक नेते प्रचारासाठी आले होते. नेत्यांनी उत्साह दाखविला तर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारत असतो. भाजपचे कार्यकर्ते उत्साहात होते तर काँग्रेसचे कार्यकर्ते हतोत्साह दिसत होते. या परिस्थितीत जे आमदार निवडूनआले आहेत ते सगळे स्वत:च्या प्रयत्नांनी निवडून आले आहेत, असे म्हणता येईल. त्यांचा स्वत:चा करिश्मा त्यांच्या उपयोगी पडला. काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रचारासाठी काही निधी दिला एवढेच, याहून अधिक पक्षाने काहीच केले नाही. वास्तविक काँग्रेसचे कार्यकर्ते आजसुद्धा गावागावात आहेत, शहराशहरात आहेत, गल्लीबोळात आहेत, नोकरशाहीत आहेत. पण त्यांना हिंमत देणारा कुणी नव्हता, ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. शरद पवार यांनी ज्या तºहेचा जोश दाखविला तसाच जोश काँग्रेसच्या नेत्यांनी जर दाखवला असता आणि प्रचारात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ताळमेळ राखला गेला असता तर दोन्ही पक्षांना जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून कितीतरी अधिक जागा ते मिळवू शकले असते. काही ठिकाणी तर योग्य व्यक्तीला तिकीट दिले गेले नाही. आश्चर्य म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारच उभा केला नाही. वास्तविक त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने जोर लावायला हवा होता. पण यावेळी प्रथमच काँग्रेसने मनसेच्या उमेदवाराला समर्थन प्रदान केले.

भाजपच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपण कोणत्या मैदानात उतरलो आहोत, याची जाणीव फडणवीसजींना होती. राज्यातील शेतकऱ्यांची दुरवस्था झालेली होती. तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे सोपे नव्हते, तरीसुद्धा त्यांनी स्वत:ची प्रतिमा स्वच्छठेवण्याचे आणि क्रियाशील राहण्याचे काम केले. यावेळी भाजपची घोषणा होती ‘अबकी बार २२० के पार’. सुरुवातीला मला वाटलेकी, भाजपला १२० आणि शिवसेनेला ८० जागा मिळू शकतील. पण माझ्या प्रवासाच्या काळात मला प्रत्यक्ष स्थिती काय आहे, तेपाहायला मिळाले. मी फडणवीसजींना सांगितलेसुद्धा की भाजपाला ११० जागांपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. तसेच शिवसेनासुद्धा ६०-६५ जागांच्या आसपास राहील. भाजपाला कमी जागा मिळण्याचे एक कारण चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न मिळणे हेही आहे. त्यामुळे समाजाचा मोठा गट भाजपवर नाराज झाला होता.

हरियाणाच्या निकालाच्या संदर्भात सांगायचे झाले तर काँग्रेसचे वरिष्ठ नेता भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपवायला हवी होती. तसेच कुमारी शैलजा यांना योग्यवेळी आणण्यात आले असते तर तेथेदेखील काँग्रेस पक्ष निश्चितपणे सरकार स्थापन करू शकला असता. येथेदेखील काँग्रेसने निर्णय घेण्यात नेहमीप्रमाणे उशीर केला. त्यामुळे हरियाणात काँग्रेसला मतदारांनी स्वीकारूनही तेथे काँग्रेसला सत्ता मिळू शकली नाही!

विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड)लोकमत समूह(vijaydarda@lokmat.com)

 

टॅग्स :congressकाँग्रेसVijay Dardaविजय दर्डाSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक