शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 08:47 IST

राज्यभरातील यंत्रणा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य प्रकारे कार्यरत असावी. परंतु, दुर्दैव असे की, हे सचिव आपली देखरेखीची भूमिका पूर्णपणे विसरलेले आहेत किंबहुना निर्ढावले आहेत.

-महेश झगडे (माजी सचिव, मंत्रालय)आपत्ती टाळण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापन सुदृढ करण्यासाठी सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असलेल्या मुख्य सचिवांनी नुकतीच राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्रशासन यंत्रणांची एक संयुक्त बैठक बोलावली, ही एक स्वागतार्ह बाब आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा काही दिवसांपूर्वी झालेला दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील साकव कोसळल्यामुळे झालेली जीवितहानी ही या बैठकीची पार्श्वभूमी होती.

होर्डिंग कोसळणे, धरण फुटणे, भीषण रस्ते अपघात, पावसाळ्यात इमारती कोसळणे किंवा नाल्याशेजारच्या झोपड्या वाहून जाणे यांसारख्या जनजीवन विस्कळीत करणाऱ्या घटना किंवा माळीण, इर्शाळवाडी यांसारख्या संपूर्ण गावावरच शोककळा पसरविणाऱ्या दुर्घटना. 

ठाण्यात संपूर्ण इमारत कोसळून सर्व रहिवासी मृत्युमुखी पडणे किंवा शासकीय कार्यक्रमात उष्माघाताने काही लोकांनी जीव गमावणे यांसारख्या असंख्य दुर्घटनांपासून काहीही बोध न घेता प्रशासन तोंडदेखले बैठकांचे सोपस्कार पार पाडते, हे आता नित्याचेच झाले आहे आणि ते आता लोकांच्याही अंगवळणी पडले आहे.

पुण्यातील दुर्घटनेत, सुट्टीचा आनंद लुटायला आलेल्या नागरिकांना थेट मृत्यूच्या दाढेत जावे लागले. त्यांच्या आनंदाच्या क्षणांना क्षणार्धात शोकांतिकेचे स्वरूप आले. ही काही अपवादात्मक उदाहरणे नाहीत. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळांवरील गर्दी आणि संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेता काही ठिकाणी बंदीही लागू केली आहे.

प्रशासनाचा मूलभूत उद्देशच हा असतो की, अशा आपत्ती उद्भवू नयेत, त्यांचा धोका अगोदरच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. विशेषतः मानवनिर्मित आपत्ती. ‘बिझनेस रूल्स’नुसार, विभागीय सचिवांवर जबाबदारी असते की, राज्यभरातील यंत्रणा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य प्रकारे कार्यरत असावी. परंतु, दुर्दैव असे की, हे सचिव आपली देखरेखीची भूमिका पूर्णपणे विसरलेले आहेत किंबहुना निर्ढावले आहेत, कारण त्यांना जाब विचारणारे कोणीच नाहीत! परिणामत: धोकादायक पूल, धरणांची मोडकळ, रस्ते अपघात, रेल्वे दुर्घटना या वारंवार घडणाऱ्या घटनांनी प्रशासनाचा कमकुवतपणा  पुन्हा पुन्हा अधोरेखित होत जातो. संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था एकप्रकारे थकलेली, गंजलेली, निष्क्रिय आणि निष्प्रभ झाली आहे.

सर्वांत खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते सचिवांपर्यंत एक परिपूर्ण जबाबदारी ठरवणारी प्रणाली अस्तित्वात आहेच. फक्त प्रत्येकजण आपली जबाबदारी पार पाडतो किंवा नाही आणि ते पाहण्यासाठी वरिष्ठ वारंवार आढावा घेऊन संबंधितांवर कामातील कुचराईबद्दल कारवाई करतात किंवा नाही, हा कळीचा मुद्दा आहे. ‘कामातील कुचराईबद्दल कारवाई’ हा भाग प्रशासनाने आपापसातील मिलीभगतमुळे केव्हाच इतिहासजमा केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईDeathमृत्यूMumbai Localमुंबई लोकल