शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 07:57 IST

Pandharpur Wari: तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो.

- डॉ. एस. एन. पठाण (माजी कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सल्लागार, विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे) पायी वारीला आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आज लाखो वारकरी पंढरपूरला पायी जात आहेत. 

रस्त्यात वारकऱ्यांची शिस्त, विठ्ठलाच्या प्रति त्यांचा निष्काम भाव, ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करत विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ हे सर्व पाहणेही अत्यंत पुण्यशील कर्म समजले जाते. असा हा वारकरी मात्र ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक असतो. 

या सामान्य वारकऱ्यांच्या चित्तशुद्धीचा निष्काम कर्माचा विज्ञाननिष्ठ प्रयोग संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या मार्गे जनतेला दिला आहे व त्याचा आता आषाढी एकादशीनिमित्ताने आध्यात्मिक उत्सव सुरू आहे. 

नानाविध भक्तीचे स्वरूप

देवाचे स्मरण, नामसंकीर्तन, श्रवण, नामोच्चार, अहंकारनिरसन, मनीमानसीपूजन, दास्यभाव, आत्मसमर्पण, सख्यभाव अशी ही नवलक्षणांनी युक्त असलेली भक्ती म्हणजे नवविधा भक्ती होय. हाच भक्तियोग वारीत साधला जातो. 

नवविधा भक्ती जो जाणतो आणि साक्षात ह्या नवलक्षणांनी युक्त अशी भक्ती करतो, तोच खरा भक्त आणि देव होय. भक्तीचा भौतिक प्रभाव मांडतानाही तुकोबा विज्ञानाचा आधार घेऊन, भक्तिमार्ग हा पूर्णपणे वैज्ञानिक असल्याचे सांगतात. 

‘नाम घेता कंठ शीतळ शरीर। इंद्रिया व्यापार नाठवती।।’ भक्ती हे सोपे कर्म असल्याचे सांगतात. परंतु, लगेच तुकोबा भक्ती ही अत्यंत कठीण अशी शुळावरची पोळी असल्याचेही प्रतिपादन करतात. भक्तीसाठी मनाचा कठोर निर्धार आवश्यक असतो आणि सर्व विकार विकृतींचाही त्याग करावा लागतो. शुद्ध अंतःकरणानेच भक्तीच्या समाधीकडे प्रवास करणे शक्य असते.

भक्ती आणि कर्माची सांगड

तुकोबांनी सर्वांनाच भक्तीचा अधिकार असल्याची घोषणा केली. ‘सकळांसी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे।।’ असे भक्तीचे स्वरूपही आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. तुकोबांनी केवळ भक्तीचाच डांगोरा पिटला आणि कर्माला दांडी मारली असे नाही. 

तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. भक्ती ही अज्ञातवासात किंवा एकांतात किंवा डोंगरदऱ्यात किंवा देवळातच केली पाहिजे, हे आवश्यक नाही. 

कर्म करताना कोणत्याही स्थळीकाळी भक्ती करता येते. भक्तीमुळे निष्काम कर्मही करता येते. माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध झाल्या की कर्म हे कर्तव्य म्हणून करणे शक्य होते. कर्माला कर्तव्य मानले की कर्माच्या फलाची आशाही सुटते आणि फलाची चिंताही मिटते. 

भक्तीचा संबंध हा मनुष्याच्या मनोपिंडाशी असतो. भक्तीच्या माध्यमाने भक्त हा देवरूप होतो. अशीच माणसे समाजाच्याही उद्धाराचे काम करतात. भक्तीची प्रक्रिया ही विज्ञाननिष्ठ प्रक्रिया असून, समाजाच्या चित्तशुद्धीचा इहवादी कार्यक्रम म्हणून तुकोबांनी भक्तिमार्ग समाजासमोर मांडला होता. 

स्वतःच्या अनुभवाने तुकोबांनी तो सिद्धही केला. भक्तीचा आणि मनाचा संबंध असतो म्हणून मनावर भाष्य करताना तुकोबा म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।।’

भक्तीचे व्यावहारिक स्वरूप

तुकोबांनी नवविधा भक्तीचेही स्वरूप स्पष्ट केलेले आहे. पूर्वसुरींच्या संतांनीही नवविधा भक्तियोगाचे प्रतिपादन केले होते. नवविधा भक्तीयोग पूर्णपणे व्यावहारिक पातळीवर आणण्याचे श्रेय मात्र, तुकोबांनाच दिले पाहिजे. 

ज्याचे नामस्मरणात चित्त जडलेले आहे अशाच लोकांचे अंकित व्हावे, दास व्हावे, असे तुकोबांना वाटते. ज्याला नवविधा भक्ती करता येते त्याचेच अंतःकरण शुद्ध होते. चित्तवृत्ती प्रसन्न आणि आनंदित होतात. जीवनातले परमोच्च असे भक्तिसुखही त्याला प्राप्त होते.

संतांनी अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितले

संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. ‘नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा’ ही संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.

संतांनी सांगितला मार्ग 

संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. तीच संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.

चित्तशुद्धीचा कार्यक्रम

संतांचा विचार हा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ आणि सर्वधर्मसमभावात्मक मानवतावादी विचार आहे. सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेच्या जगण्याचे मौलिक तत्त्वज्ञान आहे. आजच्या सांप्रदायिक अशांतता आणि दहशतवादाच्या विषाणुयुक्त भूमीवर संतविचारांची आणि संतमार्गाची पेरणी केल्यानेच जगात विश्वशांती आणि सद्भाव निर्माण होऊ शकेल.  

विश्वशांतीचे कार्य

दिंड्यांमधील पायी चालणारे वारकरी वाखरी तळावर पोहोचले की, त्यांना विसावा हवा असतो. म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी वाखरी येथे अत्यंत सुंदर ‘विश्वशांती गुरूकुल’ स्थापन केले. वारकऱ्यांसाठी २०० स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली. जवळ जवळ एक लाख वारकऱ्यांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येते. 

येणाऱ्या प्रत्येक दिंडी प्रमुखाचे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन येणाऱ्या महिला वारकऱ्यांचा शाल, पुष्पहार देऊन स्वागत हाेते. असा हा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ कार्यक्रम सुरू असतो. जणू तो आध्यात्मिक उत्सवच असतो.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा