शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना युध्दा’ पासून लोकप्रतिनिधी दूर आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 23:56 IST

एडिटर्स व्ह्यू

मिलिंद कुलकर्णीभाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर आरोप केला आहे की, ते घरात बसून असल्याने महाराष्टÑात ‘कोरोना’चा उद्रेक वाढला आहे. त्यांच्या आरोपामुळे महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लहर उठणे स्वाभाविक असले तरी म्हणावी तशी प्रतिक्रिया उमटली नाही. एखादे पत्रक निघाले, तेवढेच. याचा अर्थ काय समजायचा?लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जळगावातील चौकात एक फलक लागला होता, त्याची चर्चा या स्तंभात केली होती. ‘तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या संपर्कात आहे का? ’ असा सवाल या फलकावर विचारण्यात आला होता. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तो हटविण्यापूर्वी समाज माध्यमांमध्ये भरपूर प्रसारीत झाला.लॉकडाऊनचे चौथे पर्व सुरु झाले आहे. ५०-५५ दिवस लोटले आहेत. तरीही हा प्रश्न कायम आहे. यात दोन मतप्रवाह व्यक्त होत आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरला की, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते, जनता असा गोतावळा जमतो. हे टाळायचे असेल तर लोकप्रतिनिधीने घरुन वा कार्यालयातून दैनंदिन आढावा घेणे, अधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संपर्कात राहणे, अडचणी असतील तर वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांच्याशी संवाद साधून मार्गी लावणे ही कामे केली तर हरकत काय आहे? कोरोना युध्दात समस्या, अडचणी, गैरसोयी होणे स्वाभाविक आहे. असे संकट पहिल्यांदा आले असल्याने प्रशासकीय यंत्रणा असो की, जनता यांच्याकडून चुका होणारच. लोकप्रतिनिधी रणांगणावर उतरला तर जनता त्यांची कैफीयत मांडेल आणि प्रशासनाला नियमात शिथिलता, दुर्लक्ष करण्याची सूचना करावी, अशी अपेक्षा करेल. असे करणे हे या काळात परवडणारे नाही, म्हणून लोकप्रतिनिधींनी घरुन काम करणे केव्हाही सोयीचे आहे, असा एक मतप्रवाह आहे.दुसरा मतप्रवाह आहे की, लोकप्रतिनिधींचा सहभाग हा केवळ बैठकांपुरता मर्यादीत न राहता जर प्रत्यक्ष रस्त्यावर ते उतरले तर प्रभाव पडू शकतो. अधिकारी हे स्थानिक नसतात, त्यामुळे जनतेशी सूर जुळायला वेळ लागतो. त्यापेक्षा लोकप्रतिनिधी हा स्थानिक असतो आणि तो उत्तमप्रकारे संवाद, समन्वय साधू शकतो. हा फायदा देखील नजरेआड करता येणार नाही. दुसरे महत्वाचे म्हणजे, गावे आणि गल्लीबोळ त्याला माहित असतात. जनतेच्या मानसिकतेशी चांगला परिचय असतो. त्यामुळे या संकटकाळात योग्य निर्णय आणि मार्ग काढण्यात लोकप्रतिनिधी मोलाची भूमिका बजावू शकतो.खान्देशचा विचार केला तर काय परिस्थिती दिसून येते? तिन्ही पालकमंत्री लक्ष घालत आहेत. गुलाबराव पाटील आणि अ‍ॅड.के.सी.पाडवी हे स्थानिक आहेत. पाडवी यांनी त्यांच्या मंत्रालयाचा उपयोग करीत परराज्यात असलेल्या खान्देशी रहिवाशांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची गावापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था केली. पाटील यांनी तालुका पातळीवर आढावा बैठका घेतल्या. कोविड रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी शासन पातळीवर तसेच सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून मदत मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.अब्दुल सत्तार हे परगावचे असले तरी दोन-तीनदा ते धुळ्यात येऊन गेले. आढावा घेतला.लोकप्रतिनिधींचा विचार केला तर मात्र निराशाजनक स्थिती दिसून येते. हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढेच लोकप्रतिनिधी मैदानात उतरुन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. अनेक तर गायब आहेत. काहींनी निवासस्थान तात्पुरते अन्यत्र हलविले आहे. तर काहींनी संपर्क कार्यालय बंद केले आहे. अडचणीच्या काळात जनतेच्या मदतीला येण्याऐवजी काही लोकप्रतिनिधींनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व्यवस्थित पाळले आहे.लोकप्रतिनिधींच्या या ‘बघ्या’च्या भूमिकेमुळे काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी प्रभावशाली झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथ रोग नियंत्रण कायद्यामुळे प्रशासनाकडे भरपूर अधिकार आल्यामुळे ते त्याचा पुरेपूर वापर करीत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती दडविणे, नियम तोडून अंत्ययात्रेला गर्दी होणे, सीमा बंदी सोयिस्कर रीत्या मोडणे हे प्रकार घडत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी जाब विचारणे, धारेवर धरणे हे केवळ अरण्यरुदन ठरत आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव