शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

दोन कोटींपेक्षा जास्त विक्रीसाठी जीएसटी ऑडिट लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 03:45 IST

करनीती भाग-२८९

उमेश शर्मा । सीए

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटी आॅडिट कोणाकोणाला लागू होईल?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, २0१७-१८ मध्ये ज्या करदात्याची वार्षिक उलाढाल २ करोडपेक्षा जास्त असेल त्यांना जीएसटी आॅडिट करणे अनिवार्य आहे. करदात्याला फॉर्म जीएसटीआर - ९ ू सोबत वहीखाते व रीकन्सीलीएशन अपलोड करावयाचे आहे.अर्जुन : कृष्णा, एकूण उलाढाल म्हणजे काय?कृष्ण : अर्जुना, जीएसटी कायद्यानुसार एकूण उलाढाल म्हणजे टॅक्सेबल सप्लाय, एक्जमटेड, निलरेटेड, झीरोरेटेड, एका पॅन नं. वरती विविध राज्यांत विक्री केल्यास ती सर्व विक्री मिळून एकूण उलाढाल होईल. उदा. मिस्टर एक्सने वर्षभरात करमुक्त १ करोड ९0 लाखांचे धान्य विकले व त्यासोबत करपात्र १२ लाखांची खते विकल्यास एकूण उलाढाल २ करोडच्या वरती गेल्यास जीएसटी आॅडिट करणे अनिवार्य आहे.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर -९ ू दाखल करण्याची अंतिम तारीख कोणती?कृष्ण : अर्जुना, वर्ष २0१७-१८ च्या जीएसटी आॅडिटची ३0 जून २0१९ ही जीएसटीआर -९ ू दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याला जीएसटीआर-९ ू मध्ये काय माहिती द्यावयाची आहे?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९ ू दोन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागात करदात्याला वहीखात्यासोबत त्याचे विक्रीचे, खरेदीवरील आयटीसीचे, टॅक्स पेडचे रीकन्सीलीएशन द्यावयाचे आहे. दुसऱ्या भागात आॅडिटरला ते प्रमाणित करावयाचे आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याला जीएसटीआर-९ ू मध्ये विक्रीसंबंधी काय माहिती द्यावयाची आहे?कृष्ण : अर्जुना, करदात्याला वहीखात्यासोबत त्याचे विक्रीचे उलाढालीसोबत रीकन्सीलीएशन द्यावयाचे आहे. ती माहिती करदात्याला खालीलप्रमाणे द्यावयाची आहे.टेबल ५ मध्ये करदात्याला एकूण उलाढालीचे रीकन्सीलीएशन द्यावयाचे आहे व त्यात फरक असल्यास त्याचे कारण टेबल ६ मध्ये द्यावयाचे आहे.टेबल ७ मध्ये करदात्याला टॅक्सेबल उलाढालीचे रीकन्सीलीएशन द्यावयाचे आहे व त्यात फरक असल्यास त्याचे कारण टेबल ८ मध्ये द्यावयाचे आहे.टेबल ९ मध्ये करदात्याला कराच्या दरानुसार टॅक्सेबल उलाढालीची माहिती द्यावयाची आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याला जीएसटीआर-९ ू मध्ये आयटीसीसंबंधी काय माहिती द्यावयाची आहे?कृष्ण : अर्जुना, करदात्याला वहीखात्यासोबत त्याने घेतलेल्या आयटीसीसोबत रीकन्सीलीएशन द्यावयाचे आहे. करदात्याला खर्चानुसार आयटीसीची माहिती पुरवायची आहे.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-९ ू चा भाग ब दाखल करताना आॅडिटरची काय जबाबदारी आहे?कृष्णा : अर्जुना, आॅडिटरला त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि विसंगतता काही असेल तर ते अहवालात सादर करावे लागेल. एवढेच नाही तर आॅडिटरला आयटीसीसंंबंधी सूट, मूल्यांकन, वर्गीकरण इ. मध्ये काही तफावत आढळली तर तेसुद्धा अहवालात सादर करण्याची जबाबदारी आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, जीएसटीचे वर्ष २0१७-१८ हे प्रथम वर्ष असल्याने अनेक चुकांच्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आॅडिटवर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक करदात्याने नीट आॅडिट करून घ्यावे. सी.ए.कडून, तसेच आॅडिटरलाही खूप ताण होणार आहे. कारण, कायदेशीर तसेच तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. करदाता व आॅडिटरला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. शासनानेसुद्धा या जीएसटी आॅडिटच्या तारखांमध्ये व फॉर्ममध्ये शिथिलता द्यावी असे वाटते. 

टॅग्स :GSTजीएसटीbusinessव्यवसाय