शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

विशेष लेख: बोइंग ड्रीमलायनर - नक्की काय, कुठे चुकते आहे?

By नंदकिशोर पाटील | Updated: June 14, 2025 11:47 IST

Ahmedabad Air India Plane Crash: बोइंग ७८७ ड्रीमलायनरच्या भीषण अपघातानंतर या ‘फ्लाइंग मिरॅकल’वर संशयाचे धुके दाटले आहे. त्याबद्दल अमेरिकन माध्यमांतील चर्चेचा गोषवारा.

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर)मी सध्या अमेरिकेत आहे आणि अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेचे मोठे पडसाद अमेरिकन माध्यमांमध्ये दिसत आहेत. येथील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांमध्येही सातत्याने  सुरू असलेल्या चर्चेच्या केंद्रस्थानी अर्थातच आहे ती  अमेरिकन कंपनी बोइंग. आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक व्हावा, यासाठी विमान उद्योग सातत्याने नवकल्पनांचा आविष्कार करत आहे. या शर्यतीत बोइंगने ‘ड्रीमलायनर’ म्हणजेच ७८७ मालिकेच्या माध्यमातून विमान प्रवासाचे अवकाश व्यापून टाकले, या वास्तवाची पार्श्वभूमी या चर्चांना आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्चांकी इंधन कार्यक्षमता, प्रवाशांच्या सोयीसुविधांवर भर आणि पर्यावरणपूरकतेची विलक्षण जाणीव या सगळ्यांचे  मिश्रण म्हणजे बोइंग ड्रीमलायनर !

मात्र, या ‘ड्रीम’ विमानाच्या वाटचालीतील चिंताजनक वळणांची चर्चा सध्या अमेरिकेत सुरू आहे. सुरक्षिततेबाबतच्या शंका, उत्पादनातील अडथळे आणि उंचावलेला खर्च यामुळे ड्रीमलायनरचा प्रवास खडतर ठरत असल्याचे मत व्यक्त होत होतेच; अहमदाबाद येथील दुर्घटनेनंतर या अद्भूत विमानाबद्दलच्या चर्चेला नवे मुद्दे मिळालेले दिसतात. हा अपघात राष्ट्रीय आक्रोश आणि आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे.

बोइंग ड्रीमलायनरमध्ये आधुनिक काळातील सर्वांत प्रगत सुरक्षा प्रणाली वापरण्यात आल्या आहेत. ड्रीमलायनरचे शरीर कार्बन फायबर कंपोझिट मटेरियलने बनलेले असते. हे साहित्य ॲल्युमिनियमपेक्षा हलके, टिकाऊ आणि गंजरोधक आहे. त्यामुळे इंधन बचत होते आणि रचनात्मक अपघातांचा धोका कमी होतो. फ्लाय-बाय-वायर ही इलेक्ट्रॉनिक प्रणाली वैमानिकांना अधिक अचूक नियंत्रण देते आणि गरज भासल्यास स्वयंचलित स्थिरता राखण्यास मदत करते. तसेच लिथियम-आयन बॅटरीबाबत काही तांत्रिक बाबी समोर आल्यानंतर बोइंगने अधिक सुरक्षित बॅटरी कवच, वायुविजन प्रणाली आणि अग्निशमन उपकरणांचा समावेश केला आहे.

ड्रीमलायनरचे तब्बल लाखाहून अधिक घटक मॉनिटरिंग प्रणालीद्वारे सतत तपासले जातात. ज्यामुळे संभाव्य बिघाडाचे संकेत आधीच मिळाल्याने त्वरित उपाययोजना शक्य होते, असा बोइंगचा दावा आहे. परंतु, अहमदाबाद येथील दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात अमेरिकेतील जेफ गुझेट्टी (FAA व NTSB चे माजी प्रमुख) यांनी व्यक्त केलेली शंका महत्त्वाची ठरते. त्यांच्या मते एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग गिअर पूर्णपणे वर घेतले गेले नव्हते आणि फ्लॅप्स मूळ स्थितीत परत आलेले नव्हते (retracted), ज्यामुळे टेकऑफनंतर विमानाला आवश्यक उंची गाठता आली नसावी. ॲन्थनी ब्रिकहाऊस, आंतरराष्ट्रीय हवाई सुरक्षा तज्ज्ञ यांनीदेखील या तांत्रिक बाबींकडेच अंगुली निर्देश केला आहे

ड्रीमलायनरचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची इंधन कार्यक्षमता आणि पर्यावरणास अनुकूल असलेली रचना. पारंपरिक विमानांपेक्षा ड्रीमलायनरला सुमारे २० टक्के कमी इंधन लागते. त्यामुळेच जगभरातील एअरलाइन कंपन्यांसाठी ते अत्यंत किफायतशीर ठरते. इंधन कमी वापरल्यामुळे  कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाणही कमी होते. पंखांच्या स्मार्ट रचनेमुळे (रॅक्ड विंगटिप्स) ड्रीमलायनर बहुतेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सहज उतरण्यायोग्य आहे. बोइंग ड्रीमलायनरची (७८७-८) व (७८७-१०) किंमत २४८ दशलक्ष डॉलर  ते ३३८ दशलक्ष डॉलर दरम्यान आहे. ही किंमत मोठी असली तरी दीर्घकाळात होणारी इंधनबचत आणि देखभाल खर्चात बचत ही गुंतवणूक भरून काढते. ड्रीमलायनरच्या लांब पल्ल्याच्या प्रवास क्षमतेमुळे (१४,००० किलोमीटरपर्यंत), एअरलाइन कंपन्या अधिक नफा कमावू शकतात.

मात्र, विविध देशांमध्ये या विमानाचे वेगवेगळे भाग बनवून मग ते एकत्र जोडण्याच्या बोइंगच्या धोरणामुळे समन्वयाचा अभाव दिसून येतो, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. २०१३मध्ये लिथियम - आयन बॅटरीमुळे लागलेल्या आगींमुळे सर्व ड्रीमलायनर विमाने काही काळासाठी बंद करण्यात आली होती. अत्यंत प्रगत आणि स्वयंचलित प्रणालीमुळे वैमानिकांच्या हाताळणी कौशल्यावर परिणाम होण्याची चिंताही काही तज्ज्ञ व्यक्त करतात. दुर्घटनाग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचे गिअर आणि फ्लॅप्स का वर घेतले गेले नाहीत? ही वैमानिकाची चूक, यांत्रिक दोष होता की, संगणकीय अडथळा? टेकऑफनंतर इंजिनने पूर्ण क्षमतेने काम केले का? पक्ष्यची टक्कर किंवा इंधन प्रणालीतील बिघाड होता का? आणि वैमानिकाने शेवटच्या ३० सेकंदांत कोणते उपाय केले? हे सर्व चौकशीचे विषय आहेत.

बोइंग ड्रीमलायनर हे एक ‘फ्लाइंग मिरॅकल’ मानले जाते. इंधनबचत, पर्यावरण पूरकता आणि प्रवाशांना अत्युच्च अनुभव देण्याचे ध्येय घेऊन हे विमान आंतरराष्ट्रीय विमान उद्योगात आपली वेगळी छाप पाडते आहे. मात्र, हे यश टिकवण्यासाठी कंपनीला केवळ नवकल्पनाच नव्हे, तर जबाबदारी, पारदर्शकता आणि सतत तपासणी यांचा समतोल राखावा लागेल. ड्रीमलायनर हे भविष्यातील विमान उद्योगाचे दिशादर्शक ठरू शकते. पण, त्यासाठी केवळ ‘ड्रीम’ नव्हे, तर ‘ड्युटी’ आणि ‘सेफ्टी’ ही महत्त्वाची आहे, असा अमेरिकन माध्यमांमधील चर्चेचा एकूण सूर दिसतो.   (nandu.patil@lokmat.com)

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादairplaneविमान