शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संशय का मनी आला? अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 05:46 IST

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘राज्याच्या राजकारणात यापुढे काय होणार?’ - या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडायच्या आधीच त्यांचा मृत्यू ज्या विमान अपघातात झाला त्या अपघाताबद्दल संशयाचा धूर येऊ लागला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘राज्याच्या राजकारणात यापुढे काय होणार?’ - या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडायच्या आधीच त्यांचा मृत्यू ज्या विमान अपघातात झाला त्या अपघाताबद्दल संशयाचा धूर येऊ लागला आहे. अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित झाले आहेत. या प्रकरणातील माहिती जसजशी पुढे येईल, तसे नव्या प्रश्नांना तोंड फुटणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलेले आक्षेप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे एकामागून एक दावे यामुळे या प्रकरणात खळबळ उडाली आहे. ब्लॅक बॉक्समधून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स नष्ट झाल्याचे वृत्त आले आणि गोंधळाची जागा संशयाने घ्यायला सुरुवात झाली. ताज्या वृत्तानुसार त्यातील डेटा  डाऊनलोड करण्यात यश आले आहे. त्यामुळे या अपघाताचे पक्के सत्य बाहेर येते का, हे पाहणे महत्त्वाचे. जगात कोणत्याही विमानाला अपघात झाला की, सर्वप्रथम चर्चेत येणारा शब्द असतो तो ब्लॅक बॉक्स. फ्लाइट डेटा रेकॉर्डर.

वैमानिकांचे कॉकपिटमधील संभाषण जतन करणारे उपकरण. विमान उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या प्रवासातील संपूर्ण तांत्रिक माहिती यात डिजिटल स्वरूपात नोंदवली जाते. हा ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा नसून केशरी असतो. अपघातानंतर सहज सापडावा, यासाठी तो विमानाच्या मागील भागात बसवण्यात येतो. ब्लॅक बॉक्समधून एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत वैमानिकांचे झालेले संभाषण, अपघाताच्या वेळी विमानात नेमके काय घडत होते, अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की, मानवी चुकीमुळे याची माहिती मिळू शकते. कु

ठली उपकरणे बंद पडली होती का, हवामानाची स्थिती, ऑटो-पायलट स्टेटस, विमानाचा वेग, उंची, दिशा, इंधनसाठ्याची माहिती हे सर्व तपशील ब्लॅक बॉक्समधून स्पष्ट होतात. त्यामुळे त्यातून मिळणारी माहिती महत्त्वाची. राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते रोहित पवार यांनी अलीकडेच मुंबई व दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन संबंधित व्हीआरएस कंपनीच्या विरोधात  विमानाच्या उड्डाणापासून अपघातापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. यातील दोन मुद्द्यांची तर्काच्या पातळीवर उत्तरे मिळणे गरजेचे आहे. यापैकी पहिला मुद्दा, या विमानाच्या मुंबईतील उड्डाणापूर्वी बारामती विमान वाहतूक कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला गेला, त्यावेळी तेथील दृष्यमानता व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले.  अंदाजे सव्वातासानंतर विमान पुण्यानजीक आल्यावर वैमानिकाने एटीसीशी संपर्क साधला त्यावेळी मात्र, दृष्यमानता कमी असल्याचे सांगण्यात आले.

दिवस जसा चढत जातो, तसा प्रकाश वाढत जातो, या निसर्ग नियमाला छेद देणारे हे उत्तर वाटते. दुसरा मुद्दा असा की, एका मिनिटात १५ किलोमीटर अंतर कापण्याइतके हे विमान शक्तिशाली होते का?, उतरण्याच्या वेळी वेग कमी असला तरी अचानक काय घडले किंवा अनुभवी वैमानिकाचा अंदाज चुकला का, कमी दृष्यमानतेमुळे एकदा गो राऊंड अर्थात हवेत एक फेरी मारून आल्यानंतर दुसऱ्यावेळी वैमानिकाने आता धावपट्टी दिसत असल्याचे सांगितले आणि उतरतेवळी विमान कलंडले कसे, या प्रश्नांची तांत्रिक व तार्किक पातळीवर उत्तरे मिळणे गरजेचे आहे. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून कंपनीचे विशेष ऑडिट सुरू केले आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो अर्थात विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरोनेदेखील तपास सुरू केला आहे.

डीजीसीए आणि एएआयबी या दोन प्रमुख संस्थाच विमानाचा अपघात आणि तांत्रिक मुद्दे याची तपासणी करू शकतात. कारण, तशा पद्धतीचे गुणात्मक मनुष्यबळ आणि तांत्रिक यंत्रणा त्यांच्याकडे आहे. अशी कोणतीही यंत्रणा/क्षमता नसलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीतून तसे पाहता काय साध्य होईल, हा प्रश्नच आहे. कोणत्याही गंभीर प्रकरणात विरोधकांनी सीबीआय चौकशीची मागणी करायची आणि सत्ताधाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्याला होकार देऊन एक प्रक्रिया पार पाडायची, एवढेच काय ते ! तूर्तास तरी, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसह डीजीसीए आणि एएआयबीचा तपास यातून या प्रकरणाची उकल होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Doubt Arises: Technical, Political Issues Raised in Pawar's Death

Web Summary : Ajit Pawar's plane crash raises suspicion, sparking technical and political questions. Black box data recovery is crucial. Rohit Pawar highlights flight inconsistencies, demanding investigation. DGCA and AAIB investigate; CBI probe questioned.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटना