शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Budget 2019: मोदी सरकारकडून केवळ शब्दांची उधळपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 4:39 AM

गेली पाच वर्षे फक्त कॉर्पोरेट उद्योगपतींचे चोचले पुरवून झाल्यावर निवडणुकीच्या तोंडावर मोदींना गरीब व मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे.

- राजेेंद्र काकोडकरगेली पाच वर्षे फक्त कॉर्पोरेट उद्योगपतींचे चोचले पुरवून झाल्यावर निवडणुकीच्या तोंडावर मोदींना गरीब व मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे. आतापर्यंत मोठ्या उद्योगपतींना २ टक्के कमी व्याजदराने कर्जे पुरवून ३ लाख कोटी रु पयांचा फायदा करून दिला आहे; जो पैसा मध्यमवर्गीय व ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांकडून हिसकावला गेला आहे. तसेच मोठ्या उद्योजकांच्या ११.५ लाख कोटी बुडीत कर्जापैकी ६.५ लाख कोटींची कर्जे निकाली काढताना फक्त ३ लाख कोटी वसूल केले गेले व ३.५ लाख कोटी रुपये माफ केले गेले.अशा प्रकारे १३० कोटी जनतेमधील हजारपेक्षा कमी कॉर्पोरेटना ६.५ लाख कोटी रुपयांचा फायदा करून दिल्यावर व त्यांच्या ५ लाख कोटींच्या बुडीत कर्जांचे निवारण पुढे ढकलल्यावर पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटी व राजस्थान-मध्य प्रदेश मतदारांनी भाजपाला इंगा दाखवल्यावर बाकी जर्जर समाज-समूहाला गाजरे दाखवायचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला गेला आहे.अर्थसंकल्पीय भाषणात गरिबांना खूश करणारे अलंकारित शब्द वापरले आहेत; परंतु त्यातील आकडे बघितल्यास गरिबांना देतानाची सरकारची कंजुषी उघड होते. बिगर कॉर्पोरेट घटकांना या पूर्ण अर्थसंकल्पात काय दिले गेले? १२ कोटी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष प्रत्येकी ६००० रुपये याप्रमाणे ७५,००० कोटी रुपये दिले आहेत. कर उंबरठा ५ लाखपर्यंत वाढवून ३ कोटी मध्यमवर्गीयांचा १८,५०० कोटी रुपयांचा फायदा केला गेला. एक कोटी पगारदारांना दिलेली करांतील इतर सूट १५०० कोटी रुपये; ५० लाख व्यापाºयांना दिलेली जीएसटीमधील एकूण सूट १४०० कोटी; ५० लाख मध्यम व लघू उद्योगांसाठी ६०० कोटी; ४२ कोटी असंघटित कामगारांच्या पेन्शनसाठी फक्त ५०० कोटी. या सगळ्या ५९ कोटी लोकांसाठी ९८,००० कोटी रुपये दिले गेले, तर जेमतेम हजारेक कॉर्पोरेटसाठी ६.५ लाख कोटी रुपये, हे सरकारचे गरीबविरोधी व श्रीमंतधार्जिणे रूप.नोटाबंदी, जीएसटी व रेरा या तिळ्यांच्या प्रसूतीमुळे इमारत बांधकाम क्षेत्र पूर्ण गलितगात्र झाले होते. त्याला थोडेफार प्रोटिन पाजण्याचा प्रयत्न झालेला आहे. कर सवलतींमुळे वाहने व गृहोपयोगी उत्पादनांना पण प्रोत्साहन मिळेल. गेल्या वर्षी लावलेला इक्विटी कॅपिटल गेन कर समाप्त न केल्याने शेअर बाजारासाठी विशेष काही नाही. खासगी गुंतवणुकीसाठी चालना न दिल्यामुळे यंत्रसामग्री उत्पादकांची स्थिती डळमळीत राहील व रोजगारवाढ खुंटेल. जोपर्यंत घरगुती उपभोग व मागणी वाढत नाही तोपर्यंत सरकारच्या आर्थिक वाढीच्या आकड्यांवर विश्वास ठेवणे हाराकिरी आहे.(लेखक आर्थिक विषयांचे तज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Farmerशेतकरी