शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

‘ॲडल्टिंग १०१’ - ‘अक्कल’ शिकविणारा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:59 IST

‘Adulting 101’ : रोजच्या जगण्यात आवश्यक अशा छोट्या-मोठ्या जीवनकौशल्यांसाठी कुणावर अवलंबून राहायला लागू नये, यासाठी तयार व्हायचं असेल तर हल्लीची पिढी, खासकरून ‘जेन झी’ तरुण-तरुणी ‘ॲडल्टिंग १०१’ला पसंती देत आहेत. ‘ॲडल्टिंग १०१’ या नावाचा अभ्यासक्रमच जगातील अनेक विद्यापीठांनी सुरू केलाय.

एखाद्या दुर्गम रस्त्यावरून प्रवास करत असताना आपली गाडी पंक्चर झाली तर स्वतःचं स्वतः शर्टाच्या बाह्या मागे सारून, कारमधली आवश्यक हत्यारं काढून कुणाकुणाला पंक्चर काढता येईल किंवा निदान स्टेप्नी जोडता येईल?  दैनंदिन आयुष्य जगताना अशा कितीतरी लहान-मोठ्या अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात आणि त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आपण कुणावर तरी अवलंबून असतो. पण रोजच्या जगण्यात आवश्यक अशा छोट्या-मोठ्या जीवनकौशल्यांसाठी कुणावर अवलंबून राहायला लागू नये, यासाठी तयार व्हायचं असेल तर हल्लीची पिढी, खासकरून ‘जेन झी’ तरुण-तरुणी ‘ॲडल्टिंग १०१’ला पसंती देत आहेत. ‘ॲडल्टिंग १०१’ या नावाचा अभ्यासक्रमच जगातील अनेक विद्यापीठांनी सुरू केलाय. या अभ्यासक्रमात चक्क जीवनावश्यक कौशल्यं शिकवली जातात. त्यामुळे रोजचं जगणं जगताना एखादी अडचण आलीच तर मदत करायला कुणीतरी येईल म्हणून वाट बघत बसण्याची गरज पडत नाही. 

बदलत्या जगाच्या गरजांशी संवादी असलेल्या या अभ्यासक्रमाची रचना फार रंजक आहे. अभ्यासक्रमात काय नाही? तुमच्या स्वयंपाकघरात आग लागू नये यासाठी काय करायचं? आग लागली तर काय करायचं, इथंपासून ते नाती अर्थपूर्ण कशी करावीत इथंपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या जातात.  १९९७ ते २०१२ या काळात मुलांना जन्म दिलेल्या पालकांनी आपल्या मुलांना (हीच ती ‘जेन झी’ पिढी) अति लाडावून ठेवल्यामुळे अनेक जीवनावश्यक कौशल्यं या मुलांना अवगत नाहीत. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींसाठीही आजची तरुण मुलं इतरांवर अवलंबून आहेत. 

जीवनावश्यक कौशल्यं पालकांनी मुलांमध्ये रुजवावीत असं जगभरातले तज्ज्ञ सांगतात. मात्र, तसं न केलेल्या पालकांनी आपल्या मुलांना ‘ॲडल्टिंग १०१’सारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास सांगावं, असंही ते सुचवतात. अमेरिेकेत तसेच अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये ‘ॲडल्टिंग १०१’चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि विद्यार्थी त्यांच्यासाठी प्रवेशही घेत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणInternationalआंतरराष्ट्रीय