शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कामातिरेकापोटी जन्मलेले नवे ‘काम’सूत्र : क्वाएट क्वीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 12:32 IST

सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यात ६ दिवस काम काम, फक्त काम करण्याला नकार देणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांचा जीवतोड मेहनतीला नकार?

डॉ. भूषण केळकर, संचालक, न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन -

क्वाएट क्वीटिंग (Quit Quitting) अशी एक नवीन संज्ञा गेले दोन महिने  समाजमाध्यमात  बरीच गाजते आहे. या संज्ञेचा अर्थ असा की नोकरी तर सोडायची नाही पण पूर्ण झोकून देऊन कामही करायचे नाही! पूर्वी जसे लोक सर्वस्व ओतून काम करायचे (कामातिरेक!) तसे न करता, अगदी आवश्यक असेल तितकेच, अंग चोरून काम करायचे!  ‘सर्वस्व झोकून’ आणि ‘अंग चोरून’ अशा दोन शब्दात या दोन संस्कृती सांगता येतील! आता तुम्ही म्हणाल की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तर वरील लक्षणे स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे अमृतकालातही जिवंत आहेतच! तर मुद्दा हा की ही लक्षणे व हे नवीन ‘काम’सूत्र आता खासगी उद्योगात पण येते आहे आणि म्हणून ही चर्चा!! हे क्वाएट क्वीटिंग का होते आहे, त्याची काही कारणमिमांसा आपल्याला सहज सांगता येईल.पहिले म्हणजे लोकांच्या - विशेषत: नवीन पिढीच्या असे लक्षात आले आहे, येते आहे की, अतिप्रचंड काम करून (म्हणजे मी ज्याला ‘कामातिरेक’ म्हणतोय) बर्न आऊट होतोय आणि वर्क लाइफ बॅलन्स अजिबातच साधता येत नाही.  चीनमध्ये ‘९९६’ अशी एक संज्ञा प्रसिद्ध आहे.  त्याचा अर्थ सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यात ६ दिवस काम काम आणि फक्त काम! दुसरे म्हणजे कामाचे प्रकार, संधी इतक्या वेगवेगळ्या उपलब्ध होत आहेत की, वैविध्य व नाविन्य यामुळे पण गीग इकॉनॉमीमध्ये ‘जीवतोड मेहनत का करा’ असाही विचार बळावतोय! तिसरे म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’मध्ये एकजिनसी काम कमी होऊन मुख्यत्त्वे नाविन्यपूर्ण, प्रतिभाप्रवण कामांना असणारा वाव! चौथे कारण म्हणजे कोविड - १९! या जागतिक महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ची चटक लागल्याने, हवे तेव्हा काम करण्याची मुभा हवीहवीशी वाटू लागली; त्यामुळे  एकूणच दिनक्रमातले स्वातंत्र्य, कुटुंबाबरोबर देता येणारा वेळ वाढला, त्यातील आनंद वाढला आणि आता ऑफिसला जाऊन काम करणे, प्रवास व त्यातील ट्रॅफिकमध्ये वाया जाणारा वेळ, ती धावपळ... हे सारे लोकांना नको वाटते आहे.  कोविड काळात आणखीही काही घडले. घरूनच काम असल्याने जास्त कामाची अपेक्षाही झाली. कंपन्या व मॅनेजर्स/वरिष्ठ अवाच्या सव्वा काम झालेच पाहिजे म्हणून हटून बसले! कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यापेक्षा आपल्या कंपनीला निव्वळ नफ्यामध्येच रस असतो, याचा अनेकांना विषाद वाटला. क्वाएट क्वीटिंग हे कर्मचारी आळशी व वाईट असल्यामुळे आहे की, असंवेदनशील कंपन्या व वरिष्ठ अतिकडक असल्यामुळे आहे? याचा उहापोह ‘हावर्ड बिझनेस रिव्ह्यू’मध्ये केला गेला आहे. एक मात्र खरे, जनरेशन झेड आणि मिलेनियल्स या पिढ्यांना पैशाबरोबरच आपल्या एकूण जीवनमानाचा दर्जाही महत्त्वाचा वाटतो. त्यांच्यासाठी ‘पॅशन’ हे महत्त्वाचे मूल्य आहे. मग या क्वाएट क्वीटिंगचे काय परिणाम होतील, हे चांगलं की वाईट? मी एक छान वाक्य वाचलं ‘क्वाएट क्वीटिंग इज नॉट क्वीटिंग ऑन जॉब बट क्वीटिंग ऑन लाईफ’.मला वाटतं की, अल्प काळाच्या रोमांचकतेपोटी  क्वाएट क्वीटिंग करत राहणे हे दीर्घकालीन तोट्यात पडेल! जागतिक मंदीची चाहूल लागते आहे, बेरोजगारी वाढते आहे आणि असे अनिश्चितेचे सावट असताना हे नवे आवर्त कसे परवडेल? समजा थोडे दिवस तुमचे क्वाएट क्वीटिंग  कंपनीने सहन केले  अन् ‘भीक नको पण कुत्रा आवर’ म्हणून नारळ दिला, तर? आणि मग नवीन नोकरीसाठी चांगली शिफारस कशी मिळेल? - हाती घेतलेले काम उत्तम आणि मनापासून करणे; निव्वळ हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणे हे केव्हाही अधिक श्रेयस्कर! 

टॅग्स :Employeeकर्मचारी