शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संयमाचा साक्षात्कारी क्षण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:26 IST

कोणत्याही आव्हानाच्या काळात संयम शिकवणारा सर्वात मोठा गुरू कोणता तर निसर्ग. सात वर्षांपूर्वी कुंडीत लावलेले लिंबाचे झाड आणि २० वर्षांपूर्वी अंगणात लावलेले नारळाचे झाड या दोन झाडांनी मला हा धडा दिला.

- वंदना अत्रे (दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)कोणत्याही आव्हानाच्या काळात संयम शिकवणारा सर्वात मोठा गुरू कोणता तर निसर्ग. सात वर्षांपूर्वी कुंडीत लावलेले लिंबाचे झाड आणि २० वर्षांपूर्वी अंगणात लावलेले नारळाचे झाड या दोन झाडांनी मला हा धडा दिला. मी दिलेले खत, जीवामृत, असे पचवूनही ही झाडे बहराची कोणतीही चाहूलसुद्धा न देता उभी असलेली पाहून चिडचिड होत होती. उपटून फेकून द्यावेसे वाटण्याचे कित्येक उद्विग्न क्षण आले. मी एवढे करते याच्यासाठी, पण याला काही किंमत आहे का? हा अहंकार धडका मारत होता. पण एका साक्षात्कारी क्षणी मी प्रेमाने लिंबाच्या जवळ बसले. 

त्याला म्हटले, ‘बाबा रे, माझे प्रेम, माया तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीय यात तुझी काहीच चूक नाही, बहुदा मी कमी पडत असावे. तुला फुलायला जेवढा वेळ हवाय तेवढा घे, नाही फुललास तरी चालेल, पण माझ्या बागेतून तुला फेकून देण्याची भाषा कधीच करणार नाही यापुढे!’ यानंतर काही दिवसातच मी चमत्कार अनुभवला. लिंबाच्या प्रत्येक फांदीवर कळ्यांचे छोटे पांढरे ठिपके मोठ्या मजेत जगाकडे मान वर करून बघताना दिसायला लागले आणि नारळाच्या अंगाखांद्यावर नारळांचे इवले घोस! जाणवले, अकस्मात आलेल्या अक्राळविक्राळ आजाराशी जमवून घ्यायला आपल्या शरीरालाही असाच वेळ लागत असणार. त्या हल्ल्याने गांगरून गेलेल्या शरीरातील अनेक व्यवस्थांना स्थिर व्हायला काही काळ लागणारच की!

अशावेळी आपल्याच शरीरावर चिडचिड करून त्याला झिडकारले तर आजाराची स्थिती अधिक बिकट होते! मला आठवतेय, केमोच्या औषधांनी केवळ डोक्यावरील नाही तर पापण्या आणि भुवयांचेसुद्धा केस गेल्याने विद्रुप झालेला माझा चेहरा बघताना माझीच मला घृणा वाटली होती! प्रत्यक्षात तेव्हा माझ्या शरीराला मायेची सर्वाधिक गरज होती. ही माया आणि संयम जेव्हा आपल्या वागण्यातून दिसतो तेव्हा झाड बहरायला लागते..!lokmatbepositive@gmail.com

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी