शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१२ धडे आणि ३६५ कोऱ्या पानांचं पुस्तक उद्या मिळणार... पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:48 IST

जगण्याचं ‘इम्प्रोव्हायझेशन’ म्हणजे ‘चांगले बदल घडवून आणणे’ ही क्रिया सतत व्हायला हवी! त्यासाठी ३१ डिसेंबरसारख्या तारखा आपल्याला मदत करतात.

सोनाली लोहार, व्हॉइस थेरपिस्ट -

डिसेंबर महिना तसाही कौतुकाचाच, म्हणजे अगदीच रंगीबेरंगी. त्यात भर म्हणजे  धुक्यात भिजवून उगवलेली सकाळ! सध्या त्याला धुकं म्हणायचं की, धुरकं यावर गोंधळ सुरू आहे ही बाब सोडा; पण एकंदरीत सरत्या वर्षाचं वातावरण नक्कीच आल्हाददायक आहे.

तसं म्हणायला गेलं तर हा सगळा कॅलेंडरवरच्या आकड्यांचा खेळ, म्हणजे २०२४ संपलं आणि २०२५ उजाडलं वगैरे. खरं तर पृथ्वी तशीच गोल फिरतेय. रात्र तशीच संपतेय आणि सूर्यही तसाच वर येतोय; पण तरीही ३१ डिसेंबर ही तारीख जवळ यायला लागली, की नकळत मनात आकडेमोड सुरू होते. काहीतरी हातातून सुटतंय आणि त्यावर आपला काहीच ताबा नाही अशी काहीतरी अनाकलनीय हुरहूर लागते. सत्य हेच आहे की, सरकणाऱ्या काळावर आपलं स्वामित्व नाही, तो पुढे जाणारच आणि जाताना त्याच्या खुणा उठवत जाणार. शरीरावर, मनावर आणि सभोवतालावरही!

पुढच्या क्षणी काय होणार हे मला माहिती आहे, या भ्रमात माणसाने कधीही राहू नये, हे खरंच. अर्थात याचं आकलन व्हायलाही वयाची काही ठराविक वर्षे जातातच; पण जगण्याचं ‘इम्प्रोव्हायझेशन’ म्हणजे ‘चांगले बदल घडवून आणणे’ ही क्रिया मात्र होतच राहायला हवी आणि त्यासाठी ३१ डिसेंबरसारख्या या तारखा नक्कीच मदत करतात. जो क्षण पदरात आहे तो सर्वार्थाने जगला पाहिजे... त्या एका क्षणात मी काहीतरी छान वाचेन, काही छानसं ऐकेन, काही छान बोलेन, काही छान चव घेईन, एखादं छानसं फूल केसात माळेन, झाडाच्या गर्द सावलीत निवांत पडेन, अंगणात नाहीतर गच्चीत चादर अंथरुण एखाद्या रात्री चांदण्यांशी बोलेन, अगदीच काही नाही जमलं तर समोरच्याला एक छानसं स्माईल तरी देईनच; पण त्या प्रत्येक क्षणात मी असेन, मी जगेन!

भूतकाळात तरी माणसाने किती दिवस जगायचं आणि भविष्य तर माहीतच नसतं, मग मनातली ही हजारो किल्मिषं आणि वेदना घेऊन कुठे जाणार आहोत आपण! यावर मार्ग एकच की, डोक्यातली सगळी ओझी आणि जळमटं एक मोठा श्वास घेऊन उतरवून टाकायची, मग पुढचा प्रवास सोपा होऊन जातो. इतकं करूनही आयुष्य म्हणजे शर्यत समजूनच धावत राहिलो तर त्या प्रवासात जागोजागी लागलेली सुंदर ठिकाणं मात्र बघायचीच राहून जातील. एका मोठ्या अभिनेत्याची अत्यंत प्रामाणिक मुलाखत नुकतीच ऐकली. तीस वर्ष कामाच्या ‘नशे’त धावता धावता  स्वतःच्या मुलांचं बालपण, तारुण्य, हातातला पत्नीचा हात हे सगळच सुटून गेलं. यश, कीर्ती पैसा मिळाला; पण जे गमावलं त्याची किंमतच होऊ शकत नाही, ही खंत त्यांनी बोलून दाखवली.

हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणून उशीर होण्याआधीच आपल्या प्राथमिकता या भावनांच्या आणि जगण्याच्या गुणवत्तेच्या निकषावर तपासून बघायला हव्यात.

आयुष्य यशापयशाच्या खाचखळग्यांतूनच जाणार आणि आशा-निराशेच्या हिंदोळ्यावरही झुलत राहणार, हे अगदीच मान्य; पण आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थ नजरेनेही बघता यायला हवं. स्वतःचंच मूल्यमापन करता आलं की,  भरकटणं थांबतं.

येणारं वर्ष हे १२ धड्यांचं एक पुस्तक समजलं तर आपल्याला आपली कथा लिहिण्यासाठी नियतीने ३६५ कोरी पानं उपलब्ध करून दिली आहेत. या पानांवर काय लिहायचं हे आपण ठरवायचं. येणारी प्रत्येक सकाळ ही सकारात्मक विचारांनी आणि रात्र ही कृतज्ञतेनेच संपवूया. ‘आपण श्वास घेतोय’ हीसुद्धा किती मोठी देणगी आहे! ‘माझ्याकडे काय नाही’ या विचारापेक्षा ‘माझ्याकडे किती सारं आहे’ हा विचार मोठा नाही का? ‘समाज माझ्यासाठी काही करत नाही’ यापेक्षा ‘मी समाजासाठी काय करू शकेन’ हा विचार अधिक प्रेरकच केव्हाही! हा सगळा हलकासा नजरेतला बदल आहे; तेवढाच फक्त आपल्याला करायचाय!...बाकी, ज़िंदगी तर गुलज़ार आहेच! २०२५ चे मनःपूर्वक स्वागत आणि शुभचिंतन!     sonali.lohar@gmail.com

टॅग्स :New Yearनववर्ष