शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

एक चेंडू 30 लाखांचा, एक ओव्हर 3 काेटींची; आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी मोजले पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 12:08 IST

मुळात मीडियाचे जे हक्क दिले गेले आहेत, ते २०२३ ते २०२७ अशा पाच वर्षांसाठी आहेत. 

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधीसन २०२३ ते २०२७ या वर्षांकरिता आयपीएल क्रिकेट सामन्यांचे मीडियाचे हक्क तब्बल ४८ हजार ३९० कोटी रुपयांना विकले गेले. एवढ्या विक्रमी व्यवहारामुळे आता आयपीएल क्रिकेट थेट अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीग, अमेरिकेच्याच नॅशनल फुटबॉल असोसिएशन आणि इंग्लडच्या इंग्लिश प्रीमियर लीग या जगातील तीन प्रमुख अर्थ भक्कम क्रीडा प्रकारांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. हा व्यवहार व्यवहार्य आहे का? इतके भरभक्कम पैसे वसूल होतील का? किंवा यामुळे भारतीय जाहिरात क्षेत्राचे अर्थकारणही बदलेल का? 

हा व्यवहार व्यवहार्य आहे का?- मुळात मीडियाचे जे हक्क दिले गेले आहेत, ते २०२३ ते २०२७ अशा पाच वर्षांसाठी आहेत. - उपलब्ध माहितीनुसार, एकूण चार प्रकारांत या हक्कांची विक्री बीसीसीआयने केली आहे. यामध्ये १) भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे हक्क २) डिजिटल हक्क ३) १८ सामने (ज्यामध्ये उद्घाटनाच्या दिवसाचा खेळ, शुक्रवार, शनिवार, रविवार असे आठवड्याअंती होणारे सामने ४) उर्वरित जगात प्रसारणाचे हक्क असे चार प्रकार आहेत.n हक्कासाठी निश्चित झालेल्या एकूण ४८ हजार ३९० कोटी रुपयांचा विचार हा आगामी पाच वर्षांकरिता केला तर ढोबळमानाने, ९,६७८ कोटी रुपये वर्षाकाठी खर्च होतील. n वार्षिक खर्चासाठी झालेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत किमान १२ ते १५ टक्के जास्त रक्कम ही जाहिरात तसेच अन्य प्रमोशन्सच्या माध्यमातून मिळविण्याचे गणित मांडले जाते. 

जाहिरातीचे मार्केट किती?सन २०२२ च्या पहिल्या पाच महिन्यांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील जाहिरातींचे मार्केट हे १ लाख ७ हजार ९८७ कोटी रुपयांच्या घरात आहे. जाहिरातीच्या बाजारात ११ टक्क्यांची वार्षिक वाढ अपेक्षित असून २०२६ पर्यंत हे मार्केट १२५ कोटी ३२ लाख रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. जाहिरात देणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन आणि आपला ग्राहक या अनुषंगाने, टीव्ही, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, रेडिओ, मोबाइल जाहिराती, आऊटडोअर मीडिया आदी माध्यमांद्वारे जाहिराती देतात. 

एक असाही हिशेब... -चार वर्षांत होणाऱ्या एकूण सामन्यांची संख्या ४१०प्रत्येक मॅचमध्ये टाकल्या जाणाऱ्या चेंडूंची संख्या - २४० (नो बॉल, वाईड सोडून)एकूण ४१० सामन्यांत टाकले जाणार - ९८,४०० चेंडूएका चेंडूसाठी मोजले गेले - ५० लाख रुपयेएका ओव्हरसाठी मोजले गेले - ०३ कोटी 

टॅग्स :IPLआयपीएल २०२२businessव्यवसाय