जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:18+5:302021-02-05T08:47:18+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ६ जानेवारी २१च्या मार्गदर्शन पत्रान्वये व तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्या सुचनेनुसार ...

जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल करावा
निवेदनात म्हटले आहे की, ६ जानेवारी २१च्या मार्गदर्शन पत्रान्वये व तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्या सुचनेनुसार ५० टक्के शिक्षक उपस्थितीबाबत प्रत्येक मुख्याध्यापकाकडून नियोजन मागवले होते. त्याप्रमाणे सकाळी ८ ते ११ वाजेचे नियोजन केंद्रप्रमुखांकडे दिले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी चारही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी ते नियोजन रद्द करून मागील परिपत्रकानुसार शाळेची वेळ ९.४५ ते ४.३० केली आहे, अशा तालुकास्तरावर सूचना दिलेल्या आहेत. परंतु कोरोना काळात शाळा बंद होत्या. पण शिक्षक ऑनलाईन दरदिवशी दोन तास शिकवत होते. विद्यार्थ्यांचे पालकही या वेळेत घरी असल्याने ते विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत होते .
शाळेच्या वेळेत बदल केल्यास पालक मोबाईलसह रोजगारासाठी निघून जातात. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात खंड पडण्याची व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शासन निर्णय दिनांक १५ जून २०२०च्या पत्रान्वये सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत किंवा सोमवार, बुधवार व शुक्रवार वर्ग १ व २ व मंगळवार, गुरुवार व शनिवार वर्ग ३ व ४ असे सुरू करणेबाबत आदेश आहेत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी दररोज ८ ते ११ याच वेळेत त्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देण्याचे आदेश द्यावेत व शाळेची वेळ ७.३० ते ११ अशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना समन्वय समितीचे अध्यक्ष शिवानंद बैसाणे, सरचिटणीस किशोर पाटील, सदस्य शरद पाटील, उमराव बोरसे, प्रवीण भदाणे, चंद्रकांत सत्तेसा, भुपेश वाघ, संजय शिंदे, पुखराज पाटील, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर बाविस्कर आदी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.