तरूणांनी कौशल्य विकासावर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:26 IST2019-08-03T22:26:01+5:302019-08-03T22:26:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : देशात २०२२ पर्यत स्किल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातुन उद्योगजकता वाढीचा संकल्प केला आहे़ त्यासाठी ...

कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी़
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशात २०२२ पर्यत स्किल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातुन उद्योगजकता वाढीचा संकल्प केला आहे़ त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या उपक्रमाची घोषणा केली आहे़ विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घेऊन पदवीधर होण्यापेक्षा कलागुणांची ओळख करून कौशल्य वाढीवर भर द्यावा असे मत स्टार्ट अपचे संयोजक हर्षल विभांडिक यांनी व्यक्त केले़
देवपूर येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी प्रमुख पाहूणे प्राचार्य प्रमोद कछुवे, सिव्हील इंजिनियरींग विभागाचे प्रमुख नितीन खिवसरा उपस्थित होते़ शहरात स्टार्टअपच्या माध्यमातुन अशाच सुशिक्षीत परंतू योग्य दिशा नसलेल्या तरूणाईचा मार्गदर्शन करण्यात येत आहे़ त्यातून नवे उद्योजक निर्माण होत आहेत़ धुळे शहराची अर्थव्यवस्था मुख्यत्व कृषीप्रधान असल्याने धुळ्यात उत्पादन आणि सेवा देणाºया कंपन्या नाहीत़ जिल्ह्यातील तरूणांना शिक्षण पुर्ण झाल्यावर नाशिक, पुणे, मुंबई सारख्या शहरात स्थलांतर करावे लागते़ असे विभांडिक यांनी सांगितले़
कार्यक्रमात प्राचार्य कछुवे, खिवसरा तसेच दर्शन यादव, जयेश चौधरी यांनी स्टार्टअपच्या माध्यमातुन मिळालेली चालना मिळाली असल्याचे सांगितले़