युवा फोरम पदाधिकारी कार्यकारिणीचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:18 IST2019-04-08T16:17:12+5:302019-04-08T16:18:03+5:30

जैन सोशल गु्रप : अभियंता पाटील यांचे मार्गदर्शन

Youth Forum Executive Committee's Appointment | युवा फोरम पदाधिकारी कार्यकारिणीचे पदग्रहण

dhule

धुळे : शहरातील एस़एस़व्ही़पी़एस अभियांत्रिकी महाविद्यालयात जैन सोशल गु्रपच्या युवा फोरमच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला़
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नामको बॅकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी होते़ तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, जागतिक कीर्तीचे अभियंता विश्वविख्यात १०८ फुटी अखंड पाषाण निर्मित मूर्तीचे निर्माता सी़ आर पाटील (जैन) प्रमुख वक्ते होते़ कार्यक्रमाचे अध्यक्ष सोहन भंडारी म्हणाले की, जैन सोशल ग्रुपद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्याबद्दल समाधान व्यक्त करत पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्यात़
नूतन सचिव वर्धमान सिंगवी यांनी सांगितले की, मला मिळालेले सचिव पद हे पद नसुन समाजाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी आहे़ येणाºया काळात विविध समाजोपयोगी व लोकाभिमुख कार्य करण्यावर भर दिला जाणार आहे़ यावेळी जैन समाजातील बुध्दीकौशल्य असलेले जैनत्वाचा प्रसार करणाºया मान्यवरांना पहिल्यांदा शहरात आमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Web Title: Youth Forum Executive Committee's Appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे