युवकांनी उच्च ध्येय ठेवून कठोर परिश्रम घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:36+5:302021-07-20T04:24:36+5:30
शहरातील झेड. बी. पाटील महाविद्यालयात महाविद्यालयअंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती, रसायनशास्त्र विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीस्थित ...

युवकांनी उच्च ध्येय ठेवून कठोर परिश्रम घ्यावे
शहरातील झेड. बी. पाटील महाविद्यालयात महाविद्यालयअंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती, रसायनशास्त्र विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीस्थित केम ॲकॅडमी येथील खानदेश सुपुत्र प्रा. अविनाश मोरे यांचे "रसायनशास्त्र नेट-सेट परीक्षा तयारी" या विषयावर ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक प्रा. सुधीर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. पवार होते.
प्रा. मोरे पुढे म्हणाले की, शिक्षण हे प्रगती साधण्याचे सर्वोत्तम साधन आहे. स्वत:वर विश्वास ठेवून कामाला लागल्यास कठीण वाटणारे काम सहज करता येते. आयुष्यात जे कराल ते उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे ज्ञान असेल, तर समाजात तुम्हाला मान मिळतो. पदवीच्या शेवटच्या वर्षापासून शक्य त्या जास्तीत-जास्त प्रवेश परीक्षा देण्याचा सतत प्रयत्न करा. आपल्या विषयावर मनापासून प्रेम करा व त्याचा सखोल अभ्यास करा. कुठलीही परीक्षा देण्याआधी अभ्यासक्रम व परीक्षापद्धती नीट समजून घेऊन सर्व विषयांचा नियोजनबद्ध पध्दतीने अभ्यास केल्यास सीएसआयआर, नेट, सेट, गेट, आयआयटी, जॅम व अन्य स्पर्धा परीक्षा पास होणे सहज शक्य आहे, असे सांगितले. अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. पवार म्हणाले की, रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने नियमित, सखोल अभ्यास केल्यास नेट-सेट परीक्षा पास होणे सहज शक्य आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन रसायनशास्त्र मंडळाचे सचिव डॉ. पी. एस. गिरासे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील पाडवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्ही. बी जाधव, प्रा. अतुल पाटील, डॉ. स्वप्नील सोनवणे व विलास श्री. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, उपप्राचार्य डॉ. डी. के. पाटील, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. टी.पाटील उपस्थित होते.