तरूणाई अडकली सोशल मिडीयाच्या आहारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:16 IST2020-02-03T12:14:21+5:302020-02-03T12:16:18+5:30
रविवार सुटीचा दिवस : लोकसेवा व राज्यसेवेच्या अभ्यासात तर बहूसंख्य आढळले सोशल मिडीयावर व्यस्थ

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अरे रात्रीचे बारा वाजलेत, सकाळी शाळेत जायाचं आहे़ ना, फोन ठेव आणि झोप लवकर असा संवाद हल्ली नेहमी प्रत्येक घरातून ऐकायला मिळत आहे़ परिणामी पर्यावसन रागात व आदळ-आपटीत अनेक अनुचित प्रकार घडतात़ याबाबत लोकमत रविवारी शहरातील विविध ठिकाणी सर्वेक्षणाद्वारे पाहणी करून रविवारी सुटीच्या दिवशी तरूणाई काय करते? याविषयी जाणून घेतले़
शहरातील महापालिकेचे उद्यान, भुखंड, पाण्याची टॉकी, चौक, पांझरा नदी किणारावरील चौपाटी, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्ययालाचा परिसर १० ते ३० वर्ष वयोगटातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तासंतास सोशल मिडीयावर व्यस्थ दिसुन आली़ मुले लहान असताना त्यावेळी पालक म्हणून आई-वडिलांना त्यांचे फार कौतुक वाटते. त्याचं फोन वापरणे, फोटो पाहणे, गाणी, व्हिडिओ चालू करणे. पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक सहज लक्षात ठेवून काढणे ही आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता प्रत्येक आई-वडिलांसाठी काहीकाळ अभिमानाची गोष्ट ठरते. हीच सोशल मिडियाची आवड हल्ली मुलांसाठी घातक ठरत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले़
काही होते अभ्यासात व्यस्थ
एकीकडे युवा वर्ग व्हॉटअप, फेसबुक, युटू्यूब, पपजी गेम अशा सोशल मिडीयावर गुंतलेली होती़ तर दुसरीकडे पांझरा नदी किणारीवरील जिल्हा वाचनालच्या इमारतीमध्ये बहुसंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना आढळून आले़ तर याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एमपीएससी १३, युपीएससी सभागृहात १० विद्यार्थी व विद्यार्थींनी अभ्यास करीत होते़ त्यानंतर जेलरोडवरील गरूड वाचनालयात २० ते २५ विद्यार्थी अभ्यासात गुंतले होते़ तर बहूसंख्य युवक सोशल मिडीयाच्या आहारी अडकलेली दिसुन आले़
पालकांचे दुर्लक्ष
सकाळी सायंकाळी क्लास दुपारी शाळा असा सहा दिवसाचा नित्यपाठ मुलांचा असल्याने आठवड्यातील एक दिवस रविवारी मुलांनी खेळात वेळ द्यावा, यासाठी बाहेर पाठवतात़ मात्र बहूसंख्य मुल या संधीचा फायदा घेऊन सोशल मिडियावर वेळ घालतात़ त्याचा घातक परिणाम मुलांच्या आरोग्यावर पडत आहे़ पालकांनी मुलांच्या हिताचा विचार करू लक्ष देण्याची गरज आहे़
इंटरनेट वापरात अधिक वाढ होत असल्याने झोन न लागणे, चुकीच्या पोस्ट टाकल्याने भ्रम करून घेणे, विविध आजाराला लागते़
- डॉ़प्रविण सांळूखे
मानपचार तंज्ञ
इंटरनेट वापर गरजेचा आहे़ मात्र गैरवर्तन करणाऱ्या साईट वापर होत असल्याने मुलांवर वाईट परिणाम होत आहे़ यासाठी पालकांनी मुलाकडे लक्ष द्यावे़
- मनिषा जोशी
मुख्यध्यापिका कमलाबाई शाळा