धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथील विठ्ठल बापू कोळी (२०) या तरुणाचा बुराई नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमाराला घडली़ गुरे चारण्यासाठी नदीकाठी गेला होता़ पाय घसरुन नदीत पडल्याचे सांगण्यात आले़ ही माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले़ शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल केले होते़ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे़दरम्यान, धुळे तालुक्यातील कुंडाणे वार शिवारात असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयात बुधवारी अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयाच्या अनोळखी पुरूषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला़गावकऱ्यांच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेने हिरे रुग्णालयात पाठविण्यात आला़ डॉक्टरांनी तपासणीअंती अधिकृतरित्या मयत घोषित केले़ अजुन ओळख पटलेली नाही़
बुराई नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 21:48 IST