ट्रॅक्टर अपघातात तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:22 IST2020-05-11T21:22:27+5:302020-05-11T21:22:48+5:30

दलवाडे शिवार : ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

Young man dies in tractor accident | ट्रॅक्टर अपघातात तरूणाचा मृत्यू

ट्रॅक्टर अपघातात तरूणाचा मृत्यू

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे शिवारात भरधाव ट्रॅक्टर उलटून त्यात बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला़
चेतन रविंद्र पाटील (३२, रा़ दलवाडे ता़ शिंदखेडा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे़ शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे शिवारात असलेल्या हिंमत नामदेव कोळी यांच्या शेताजवळ असलेल्या कच्या रस्त्यावर एमएच १८ एएन ४५० क्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने येत होते़ रस्त्याच्या खराबीमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी झाले़ ट्रॅक्टरवर बसलेला चेतन पाटील हा तरुण खाली फेकला गेला़ परिणामी त्याच्या डोक्याला, मानेला, छातीला जबरदस्त मार लागला़ गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला़
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविल्याने ही दुर्घटना घडल्याने हा अपघात झाला असल्याने याप्रकरणी संशयित आरोपी विजय प्रभाकर पाटील (रा़ ब्राम्हणे, ता़ शिंदखेडा) या ट्रॅक्टर चालकाविरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सी़ जी़ नागरे घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: Young man dies in tractor accident

टॅग्स :Dhuleधुळे