बँकिंग क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेत सहकाऱ्यांकडून होणाºया छळास कंटाळून तरुणाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 21:39 IST2021-03-13T21:38:54+5:302021-03-13T21:39:18+5:30
मयत तरुणाच्या भावाने एक महिन्यानंतर पोलिसात दिली फिर्याद, गुन्हा दाखल झाल्याने तपासाला सुरुवात

बँकिंग क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेत सहकाऱ्यांकडून होणाºया छळास कंटाळून तरुणाने केली आत्महत्या
धुळे : बँकिंग क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेत आपल्यापेक्षा पुढे जाणाºया तरुणाचा त्याच्याच सोबत काम करणाºया तीन तरुणांनी मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून ३० वर्षीय प्रशांत पवार या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. घटनेच्या एक महिन्यानंतर मयताच्या भावाने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
धुळे शहरात बँकिंग क्षेत्रात काम करणारा प्रशांत पवार (वय ३०) हा गेल्या ८ ते १० वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत होता. २०१८ पासून तो धुळ्यातील एका खासगी बँकेत कामाला लागला होता. नोकरीत त्याने खूप चांगले केले. सर्व टारगेट त्याने पूर्ण करण्याचा धडाका लावला. प्रशांत हा आपल्या पुढे जात असल्याचे पाहून सोबतच कारणाºया त्याच्या सहकाऱ्यांना त्याच्या कामाच्या धडाक्याची धडकी भरली. आपल्या पुढे जाऊ नये या भावनेतून त्याच्या छळाला सुरुवात झाली. उद्दिष्ट पूर्ण करू न देणे, वैयक्तिक बदनामी करणे असे उद्योग करत दीपक पाटील, प्रमोद हिंगणे आणि मोहित पवार (कोणाचेही पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांकडून प्रशांत पवारचा छळ सुरू होता. सततच्या छळाला कंटाळून प्रशांत याने २ फेब्रुवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली. सुरुवातीला देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मयताचा भाऊ जितेंद्र जिजाबराव पवार (२७, रा. शिवाजी नगर, नगावबारी, देवपूर धुळे हल्ली मुक्काम सीबीडी बेलापूर, मुंबई) याने एक महिन्यानंतर मार्चमध्ये देवपूर पोलीस स्टेशनला आपल्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत वरील तीनही तरुणांविरोधात फिर्याद दाखल केली. त्या फियार्दीनुसार संशयित दीपक पाटील, प्रमोद हिंगणे आणि मोहित पवार (कोणाचेही पूर्ण नाव माहीत नाही) या तिघा संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार घटनेचा तपास करीत आहेत.