बाळाला होणारा एचआयव्ही टाळू शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 12:41 IST2020-11-29T12:40:37+5:302020-11-29T12:41:34+5:30

कार्यक्रम अधिकारी शीतल पाटील

You can avoid HIV in your baby | बाळाला होणारा एचआयव्ही टाळू शकता

dhule

चंद्रकांत सोनार
जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांची प्रमाण अधिक होते. आरोग्य विभागाकडून जनजागृती, रूग्णांची तपासणी, औषधोपचार होत असल्याने एड्सवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तसेच मृत्यू दराचे प्रमाण कमी झालेले आहे. लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी व गरोदर मातांना शंका असल्यास १ डिसेंबर रोजी जागतिक ए्डस दिनी तपासणी करून घ्यावी. बाधित आढळून आलेल्या रूग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केला जातो. तसेच त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येते असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी शीतल पाटील यांनी दिली.

प्रश्न : गरोदर मातेकडून तिच्या बाळाला एचआयव्ही संर्सगचे किती प्रमाण आहे?
उत्तर: बाधित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला एचआयव्ही टाळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहे. बाधित मातेला वेळोवेळी औषधोपचार केले जातात. तसेच प्रसृतीसाठी देखील पाठपुरावा व काही महिने तपासणी केली जाते. त्यामुळे मातेकडून बाळाला होणारा एचआयव्ही संर्सग टाळता येतो.
प्रश्न : दीड वर्षात किती माता बाधित आहेत. व सद्यस्थिती काय ?
उत्तर: एड्स नियंत्रण विभागाकडून एचआयव्ही रोखण्यसााठी विशेष प्रयत्त केले जात आहे. साधारणपणे २०१९ ते आजपर्यत २९ गरोदर मातांना एचआयव्ही बाधित आढळून आलेल्या आहे. तयात एचआयव्ही करीता अपेक्षित असलेल्या २४ बालके ही एचआयव्ही मुक्त झालेले आहेत. त्यांची देखील तपासणी एचआयव्हीची तपासणी करण्यात आलेली आहे.
प्रश्न : मुख्यत: एचआयव्हीची संर्सगाचे कारणे कोणती?
उत्तर: एचआयव्ही आजाराचा संर्सग मुख्यता चार मार्गाने होऊ शकतो. त्यात असुरक्षित लैगिंक संबध, एचआयव्ही बाधित रक्त किंवा रक्तघटक घेतलेल्या व्यक्तीपासून, दुषीत सुया, एचआयव्ही बाधित गरोदर मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला धोका होऊ शकतो. त्यासाठी खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे. शिरपूर व साक्री तालुक्यात विशेष: बाधितांचे प्रमाण अधिक आढळून येते. त्यासाठी वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.
प्रश्न : कोरोना काळात किती एडस बाधितांना कोरोनाची लागण झाली ?
उत्तर: एचआयव्ही बाधितांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे अन्य आजाराचा संर्सग तत्काळ होतो. कोरोना विषाणूचा संर्सग टाळण्यासाठी जिल्हातील बाधितांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. आतापर्यत एकाही एचआयव्ही बाधिताला कोरोनाची लागण झालेली नाही. तसेच लॉकडाऊन काळात औषधीची गैरसोय होऊ नये, यासाठी घरपोच व्यवस्था करण्यात आलेली होती.
बाधितांना चांगली वागणूक द्यावी
एडस बाधित व्यक्तीला समाजाकडून चुकीच्या पध्दतीने वागणुक दिली जाते. एड्सची लागण चार पध्दतीने होऊ शकते. मात्र केवळ एड्स आहे, म्हणून समाजाचा बाधित व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. एड्स बाधित व्यक्तीला समाजाकडून दिलासा देण्याची गरज आहे. तरच तो व्यक्ती प्रसंग व आनंदी राहून आजाराचा सामना करू शकतो.
प्राथमिक आरोग्य केद्रातून उपचार
शहरी भागातील पाच शहरी आरोग्य केद्र व १९ पीपीपी अंतर्गत खाजगी दवाखान्यातून रूग्णांवर उपचार केला जातो. तसेच शासनाकडून देखील त्यांना आहारासाठी मानधन देण्यात येते. त्यामुळे घाबरून न जाता आजाराला सामोरे जाण्याची गरज आहे.
दुसऱ्या लाटेसाठी सज्ज
कोराचा आठ महिन्याचा काळात आतापर्यत एकाही एड्स बाधित व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही. कोराचा दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी देखील खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती शितल पाटील यांनी दिली.

Web Title: You can avoid HIV in your baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे