शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:21 IST2020-06-29T21:21:20+5:302020-06-29T21:21:45+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव : खान्देशातून येतात भाविक

शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील यात्रोत्सव रद्द
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या पांडूरंगाची यंदाच्या वर्षी होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ याठिकाणी खान्देशातून भाविक येत असतात़
शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाºया श्री पांडुरंगाची यंदा १ जुलै रोजी यात्रोत्सव येत आहे़ यात्रोत्सवाला ३७ वर्षांची परंपरा असून यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे़ त्यामुळे यात्रोत्सवात येणारे भाविक, व्यवसाय, दुकानदार, पूजा-पत्री, नारळ, फुल- हार विक्रेते, संसार उपयोगी साहित्य विकणारे, हॉटेल इत्यादी व्यवसायिकांनी यात्रेला येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे़ तसेच या दिवशी श्री पांडुरंगाची नित्यनेमाने पूजा, काकडा आरती, अभिषेक हे धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होईल. या काळात होणाºया कीर्तन व भजन सोहळा देखील रद्द करण्यात आलेला आहे़
पायी दिंडी सोहळाही रद्द
शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे येणाºया भाविकांची संख्या सर्वाधिक आहे़ खान्देशातील भाविक याठिकाणी होणाºया यात्रोत्सवासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी येत असतात़ त्यात हजारो भाविकांचा समावेश आहे़ पण यंदाच्या वर्षी यात कोरोनामुळे बदल करण्यात आलेला आहे़ भाविकांनी आपापल्या घरी श्री पांडुरंगाचे नामस्मरण व पूजा पाठ करावा याबाबत सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हभप तथा माजी आमदार संभाजीराव हिरामण पाटील, मनोहर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, निलेश पाटील व इतर विश्वस्त यांनी भाविकांना केले आहे़