यशवर्धन राजवर्धन कदमबांडे शिवसेनेत प्रवेश करणार; मातोश्री येथे शिवबंधन बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 14:44 IST2022-10-19T14:32:42+5:302022-10-19T14:44:30+5:30
छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन राजवर्धन कदमबांडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.

यशवर्धन राजवर्धन कदमबांडे शिवसेनेत प्रवेश करणार; मातोश्री येथे शिवबंधन बांधणार
राजेंद्र शर्मा, धुळे - छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन राजवर्धन कदमबांडे आज दुपारी ३ वाजता मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.
यशवर्धन कदमबांडे यांनी आपण दोन वर्षापासून राजकारणात सक्रीय नव्हतो. आता सक्रीय राजकारणात येत असून एकटाच मातोश्रीवर आज प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र वडील भाजपातच असल्याचेही सांगितले. भाजपाचे जेष्ठ नेते धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझा यशवर्धनशी संपर्क होत नसल्याने काही सांगू शकत नाही. पण मी भाजपातच असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी धुळ्यातच आहे. त्यापैकी जेष्ठ नेते प्रा.शरद पाटील यांनी सांगितले की, हे वृत्त खरे आहे. ते आज मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. अन्य पदाधिकाऱ्यांनी चर्चा सुरु आहे.