पश्चिम पट्टयात पिकतोय काळा भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:45 IST2020-11-09T22:45:53+5:302020-11-09T22:45:53+5:30
पिंपळनेर : आदिवासी समाजाचे मुख्य पीक समजले जाणारे काळा भात या पिकाची लागवड पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ...

पश्चिम पट्टयात पिकतोय काळा भात
प ंपळनेर : आदिवासी समाजाचे मुख्य पीक समजले जाणारे काळा भात या पिकाची लागवड पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर होते. या भाताला खान्देशात संपूर्ण महाराष्ट्रात मागणी असल्याने काळा भातची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यात इंद्रायणी सुकवेल, जिरा, भवड्या, चिमनसाळ, कमद यासोबतच मणिपूरच्या काळाभाताची लागवड रोहोड येथील सरपंच हिंमत साबळे यांनी आपल्या शेतात करीत याचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे आता पश्चिम पट्ट्यात सफेद भातासोबत आता काळ्या भाताची चर्चा वाढली आहे. लुपिन फाउंडेशन धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच उत्पन्नवाढीसाठी विविध मार्गांनी मदत करत असते, त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने एक नवीन उपक्रम साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू केला आहे.विविध प्रथिने आणि पोषणतत्वे असलेला,ग्लूटेनचे नगण्य प्रमाण असलेला मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त ,जीवनसत्व ई, लोह,कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असलेला काळा भात यावर्षी पहिल्यांदाच साक्री तालुक्यातील रोहोड, कुडाशी व उमरपाटा या परिसरातील पाच गावातील वीस शेतकऱ्यांनी पिकविला असून या करिता लुपिन फाउंडेशन धुळेने प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रावर लागवडसाठी मोफत बियाणेचे सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोग टाळता येऊ शकतो आणि शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी करता येऊ शकतं,असा हा बहुपयोगी काळ भात पिकण्याचे प्रमाण मात्र कमी आहे.या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल उत्पन्न येते.