कोरोना बाधितांचा द्बेश करणे चुकीचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:47 IST2020-05-31T12:43:45+5:302020-05-31T12:47:43+5:30
जनता कफ्यूचे पालन करा..

dhule
चंद्रकांत सोनार ।
शहरातील एका वयोवृद्ध महिलेचा कोरोना बाधित असल्याने अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी पाठ फिरवली अशा वेळी मुस्लिम बांधवांनी मयताच्या मुलास आधार देत़ अंत्यविधी पार पाडला़ कोरोनाचे संकट कधीही केव्हाही व कुणावरही येवू शकते़ मात्र प्रत्येकाने माणुसकी विसरून चालणार नाही़ धुळेकरांनी या महामारीच्या काळात एकमेकांना साथ द्या! तरच आपण या युध्दात जिंकू शकतो़ असे मत मनपा उपायुक्त शांताराम गोसावी यांनी ‘लोकमत' शी बोलतांना व्यक्त केले़
प्रश्न : अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या विरोधात विषयी काय सांगाल
उत्तर : करोना विषाणूमुळे माणसाची जीवनशैली खूप मोठा बदल झाला आहे़ या साथीच्या आजारामुळे प्रत्येकांनी जात, पात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रांत देश यांच्या मयार्दा ओलांडलेली आहे़ त्यामुळे विषाणूची लागण कधीही केव्हाही व कोणालाही होऊ शकते़ त्यासाठी काळजी व खबरदारी घेण्याची गरज आहे़ बाधिता मनात द्वेश ठेवूऩ मृत्यूनंतर अत्यसंस्कारास विरोध चुकीचा आहे़
प्रश्न : सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल काय सांगाल
उत्तर : कोरोनाची लागण झाल्यास अनेकांकडून मोठ्या प्रमाणात तिरस्कार केला जातो़ त्यामुळे बाधितावर मुलाने अग्निडाग दिल्यास नकार दिल्याने एका नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाºयांने स्व:ता अग्निडाग देण्याची भुमिका घेतली़ आई-वडील मुलांसाठी करोडो रूपयांची मालमत्ता जमा करून ठेवतात व एैनवेळी बाधितामुळे त्यांचा मृृत्यू झाल्यास अग्निडाग देण्यास नकार देतात हे मात्र चुकीचे आहे़
प्रश्न : कोरोनावर मात करण्यासाठी काय करावे?
उत्तर : कोरोनाच्या पार्शभूमीवर देशात लॉकडाऊन केले आहे़ लॉकडाऊन संपल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे़ स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, वेळो-वेळी हात धुणे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, विशेषत: गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन शांतराम गोसावी यांनी केले़
जनता कफ्यूचे पालन करा..
कोरोनाच्या विषाणुमुळे उध्दवनाच्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे़ या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी व निर्माण झालेल्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी सोमवारी १ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पावेतो संपुर्ण दिवसभर जनता कफ्यू ठेवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ नागरिकानी नियमाचे पालन करावे़ धुळेकरांनो शहरात विनाकारण फिरू नका
कोरोनावर सध्या औषधी उपलब्ध नाहीत़ त्यामुळे काळजी घेणे एकमेव उपाय आहे़ त्यासाठी प्रत्येकाने आपला जीव कसा वाचविता येईल याची काळजी घेणे महत्वाचे आहे़ शहरात लॉकडाऊन असतांनाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरतात़ बाहेर विनाकारण फिरणे म्हणजे तुम्हीच या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे़