धुळ्यातील मल्ल देशभरात नाव गाजवतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:52+5:302021-02-05T08:45:52+5:30
धुळे शहरातील जवाहर स्टेडियम मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने अनेक महिन्यांपासून बंद होते. या स्टेडियमची सुधारणा होण्यासाठी व मल्लांना ...

धुळ्यातील मल्ल देशभरात नाव गाजवतील
धुळे शहरातील जवाहर स्टेडियम मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने अनेक महिन्यांपासून बंद होते. या स्टेडियमची सुधारणा होण्यासाठी व मल्लांना सराव करण्यासाठी स्टेडियम उपलब्ध व्हावे. जिल्हा तालीम संघाचे तालुकाध्यक्ष कल्याण गरुड यांच्यावतीने मनपा सभापती सुनील बैसाने यांच्याकडे मागणी केली होती.
या मागणीला दुजोरा देत स्टेडियमची सुधारणा केली.
यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा धुळे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मनपा सभापती सुनील बैसाने, तालुका तालीम संघाचे अध्यक्ष कल्याण गरुड, नगरसेवक नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, भगवान कालेवार, प्रदीप पानपाटील, सचिन कराड, उमेश चौधरी आदीसह मल्ल उपस्थित होते.
यावेळी सभापती सुनील बैसाणे म्हणाले की, धुळे शहराला महाराष्ट्र राज्यात कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर मल्लांना सराव करण्यासाठी देवपुरात जवाहर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. मात्र स्टेडियमची दुरवस्था झाल्याने मल्लांना सराव करणे कुस्त्यांची दंगल घडवणे शक्य होत नव्हते. ह्या स्टेडियमची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी मनपा सभापती सुनील बैसाने यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार १५ लाखांच्या निधीतून जवाहर स्टेडियमची सुधारणा करण्यात आली आहे. स्टेडियमची सुधारणा झाल्यानंतर कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. मल्लांनी माजी. आ. राजवर्धन कदमबांडे, सभापती सुनील बैसाने, नगरसेविका प्रतिभा चौधरी, नगरसेवक नागसेन बोरसे यांचा सत्कार करण्यात आला.