धुळ्याहून पंढरपुरला जाणाऱ्या पहिल्या बसचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:25 IST2019-07-09T11:25:11+5:302019-07-09T11:25:30+5:30

भाविकांचा सत्कार, विठू नामाच्या जयघोषाने बसस्थानक दुमदुमले

The worship of the first bus from Dhundi to Pandharpur | धुळ्याहून पंढरपुरला जाणाऱ्या पहिल्या बसचे पूजन

धुळ्याहून पंढरपुरला जाणाऱ्या पहिल्या बसचे पूजन

आॅनलाइन लोकमत
धुळे : आषाढी एकादशीनिमित्ताने धुळे आगारातून पंढरपूरला भाविकांना घेऊन जाणाºया पहिल्या बसचे सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले. हा उपक्रम वारकरी सेवा समिती धुळे व एस.टी.महामंडळ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी पंढरपुरला जाणाºया भाविकांचा महामंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धुळे आगारातून पंढरपूरला जाणाºया प्रथम बसचे महापौर चंद्रकांत सोनार यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विठू माऊलीच्या प्रतिमेचे मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी पहिल्या बसमध्ये असलेल्या भाविकांचा धुळे बस आगाराच्यावतीने गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. या बसमध्ये ४४ भाविक होते. बसचे पूजन व वारकऱ्यांचा सत्कार झाल्यानंतर बस पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.यावेळी भाविकांनी केलेल्या विठू नामाच्या जयघोषाने बसस्थानक दुमदुमले होते.
यावेळी वारकरी पाठशाळा गोंदूरचे अध्यक्ष बाळासाहेब मुसळे, मठाधिपती भाऊ रूद्र, खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे, शरद खोपडे, राजेंद्र मुर्तडकर, वासुदेव पवार, भाऊसाहेब देशमुख, अ‍ॅड. मनोज वाघ, देवीदास माळी, नथ्थु चौधरी, नरेश सोनार, राजू गवळे, धुळे आगारप्रमुख भगवान जगनोर, कैलाश शिंदे, घनश्याम बागूल आदी उपस्थित होते.
धुळे आगारातर्फे आषाढीनिमित्त जादा बससेवा गेल्या दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेली आहे. १३ जुलैपर्यंत ही सेवा सुरू राहील. बससेवेला प्रतिसाद मिळतो आहे. सोमवारी देखील १० ते १२ बस सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी दिली.

Web Title: The worship of the first bus from Dhundi to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे