गरीबांना कोरोनापेक्षा अन्न शिजविण्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:35 IST2020-05-16T21:35:10+5:302020-05-16T21:35:57+5:30
बिकट स्थिती । सरपण वेचण्यात जातो त्यांचा दिवस

गरीबांना कोरोनापेक्षा अन्न शिजविण्याची चिंता
धुळे : कोरोना या विषाणूने सर्वत्र कहर माजविला असताना मात्र आजही गरीबांपर्यंत या विषयाची दाहकता पोहचलेली आहे़ महामार्गानजिक सरपण गोळा करुन त्याच्या माध्यमातून अन्न शिजविण्यासाठी बहुतेकांची दैनंदिन धडपड सुरु आहे़ त्यामुळे आजच्या परिस्थितीत गरीबांचा संपुर्ण दिवस हा सरपण गोळा करण्यात जातो़ इतकी बिकट परिस्थिती आजही पहावयास मिळत आहे़
कोरोना विषाणूपासून सुटका व्हावी यासाठी देशपातळीवरुन लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे़ त्यानुसार स्थानिक पातळीवर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ नागरिकांना देखील वेळोवेळी सुचना आणि आवाहन करुन घरातच थांबण्याचे सांगितले जात आहे़ असे असताना गरीबांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत़ घराच्या बाहेर पडणार नाही, अन्न शिजविण्यासाठी सरपण अर्थात लाकूड गोळा करणार नाही तर कसे चालेल़ कोरोनाच्या लढाईपेक्षा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात आजही गरीबांचा संपूर्ण दिवस कष्टात जात आहे़