मालपूर शिवारात जागतिक कृषी महोत्सव सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 23:11 IST2021-01-23T23:08:39+5:302021-01-23T23:11:30+5:30
गुरुकुल इंग्लिश स्कूलचे मैदान : महिलांसह शेतकऱ्यांची उपस्थिती

मालपूर शिवारात जागतिक कृषी महोत्सव सप्ताह
मालपूर - शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल येथे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी जि. नाशिक यांच्या तर्फे नऊ वर्षांपासून नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मात्र यावर्षी उद्भवलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुभार्वामुळे सदर कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्र सहीत परराज्यात व परदेशात दि. २२ ते २८ जानेवारी या कालावधीत अकराशे ठिकाणी अशाच पध्दतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जागतिक कृषी महोत्सव सप्ताह घेतला जात आहे़
या कार्यक्रमासाचे उद्घाटन ह. भ. प. परमेश्वर महाराज सुराय यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, गुरुकुलचे चेअरमन युवराज सावंत रवींद्र पाटील, प्रशांत पवार दिंडोरी येथील सेवक डॉ. नंदकुमार उदावलकर उपस्थित होते.
अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लाखो शेतकºयांना तज्ञ व अभ्यासकांच्या माध्यमातून कमी खर्चात विष मुक्त शेतीचे मार्गदर्शन केले जात आहे. कृषी व जोड व्यवसाय तसेच सामाजिक उपक्रम अंतर्गत आत्महत्या ग्रस्त शेतकºयांच्या मुलामुलींचे विना हुंडा विवाह लावणे.
ग्रामविकासाठी सरपंच मांदियाळी द्वारे प्रबोधन सुध्दा केले जात आहे. प्रामुख्याने या एकदिवसीय कृषी महोत्सव सप्ताहात कृषी विषयासोबत भारत व कृषी संस्कृती, पशुधन व गोवंश, दुर्मिळ वनौषधी व आरोग्य बी बियाणे पर्यावरण शेतीवर आधारित जोडव्यवसाय स्वयंरोजगार मुलामुलींसाठी विवाहासाठी सुयोग्य स्थळांची माहिती तसेच बाल संस्कार विभाग, वास्तुशास्त्र विभाग, गर्भसंस्कार विभाग, प्रश्नोत्तर विभाग आरोग्य इत्यादी विषयांवर या महोत्सवात मार्गदर्शन केले गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दोंडाईचा येथील सेवकांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला परिसरातील सुराय, कर्ले परसोळे चुडाणे अक्कलकोस येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.