हाॅकी विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:25+5:302021-03-25T04:34:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क थाळनेर - येथील कला महाविद्यालयात हॉकी खेळावर क्रीडा विभागाच्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ...

हाॅकी विषयावर कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
थाळनेर - येथील कला महाविद्यालयात हॉकी खेळावर क्रीडा विभागाच्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. राहुल पाटील (शिंदखेडा) यांनी हॉकी खेळावर विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. प्रा. पाटील म्हणाले की, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून, हा एकमेव सांघिक खेळ आहे, ज्यात भारताला ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्णपदके मिळाली आहेत. हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, भारताची उज्ज्वल प्राचीन परंपरा असलेला हा खेळ आज मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जे. गावीत यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. टी. आर. शर्मा यांनी केले तर मराठी विभागाचे प्रा. व्ही. डी. झुंजारराव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.