म्हसदी गणातील ग्रामपंचायतींची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST2021-03-18T04:35:58+5:302021-03-18T04:35:58+5:30
म्हसदी : ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत वार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीच्या म्हसदी प्र नेर गणातील सहा ...

म्हसदी गणातील ग्रामपंचायतींची कार्यशाळा
म्हसदी : ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत वार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीच्या म्हसदी प्र नेर गणातील सहा ग्रामपंचायतींची कार्यशाळा येथील धनदाई देवी मंदिर परिसरात घेण्यात आली. सरपंच शैलेजा राजेंद्र देवरे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होत्या. १५ व्या वित्त आयोगातून सन २०२१- २०२२मध्ये करावयाच्या विविध विकासकामांचे नियोजन करून त्याला ग्रामपंचायतीची मंजुरी घेऊन १५ मार्चपूर्वी शासनाच्या ग्रामस्वराज्य या संगणकीय प्रणालीवर हा विकास आराखडा तयार करून अपलोड करावयाचा आहे. त्यासाठी म्हसदी प्र नेर गणातील म्हसदीसह राजाबाई शेवाळी, वसमार, काळगाव, ककाणी, चिंचखेडे येथील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य इंदूबाई मल्हारी गायकवाड, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, सरपंच शैलेजा देवरे, धनदाई देवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, सचिव महेंद्र देवरे, ककाणीचे सरपंच सचिन बेडसे, राजबाई शेवाळीचे सरपंच नीलेश शिंदे, अक्कलपाडाचे सरपंच श्रीराम कर्वे, म्हसदीचे उपसरपंच चंद्रकांत देवरे, चिंचखेडे सरपंच अभिमन सोनवणे, वसमारच्या सरपंच संगीता नेरे, उपसरपंच विमलबाई काटके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर राजेंद्र देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा भामरे, नीलेश शिंदे, मयुरी विसपुते, सरपंच शैलेजा देवरे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर अंबावाडी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र देवरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र देवरे, समाधान देवरे, प्रकाश खैरनार, प्रवीण देवरे, भूषण चव्हाण, सचिन मोहिते, सिद्धार्थ मोहिते यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेला म्हसदी गणातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यक, जिल्हा परिषद मराठी शाळांचे शिक्षक, आदी उपस्थित होते.