‘कॅडकॅम व थ्रीडी प्रिंटींग’वर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:53 IST2020-02-12T20:53:19+5:302020-02-12T20:53:47+5:30
शिरपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : भविष्यातील तंत्रज्ञानाचे महत्व व त्याबद्दलची माहिती अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना मिळावी याहेतूने मुंबई येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेच्या शिरपूर येथील मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीरिंग महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘कॅडकॅम आणि थ्री-डी प्रिंटींग’ विषयक तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
याप्रसंगी संचालक डॉ.आर.एस. गौड, सहयोगी अधिष्ठाता डॉ.नारायण चांडक, प्रशासक राहुल दंदे उपस्थित होते. कार्यशाळेला धुळे, जळगाव, नंदुरबार, इंदूर, उज्जैन येथील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादकता व अचूकता वाढवण्यासाठी संगणकाच्या मदतीने चालणारे सी.एन.सी., व्ही.एम.सी. मशीन, त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, कोडींग आदीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. उत्पादन प्रक्रियेचा वेग, आरोग्य व इतर प्रकारात होणारे संशोधन, अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात अतिशय महत्वाची भूमिका असणाऱ्या परंतू अजूनही अभियांत्रिकी शिक्षणात फारसा अंतर्भूत नसणाºया थ्री-डी प्रिंटिंग या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कुलगुरू डॉ.राजन सक्सेना, प्र.कुलगुरू डॉ.शरद म्हैसकर, डॉ.आर.एस. गौड, डॉ.एन.के. शर्मा, डॉ.नारायण चांडक, राहुल दंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.राकेश चौधरी, प्रा.सुधीर चौरे, प्रा.ऋषिकेश दंडगव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.