जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:55 IST2019-11-23T22:54:41+5:302019-11-23T22:55:10+5:30
जिल्हा परिषद निवडणूक । राष्ट्रवादीच्या बैठकीत किरण शिंदे यांचे आवाहन

जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे
साक्री : विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार यांच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे़ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पाडून घेण्यासाठी आणि त्या जागा निवडून आणण्यासाठी पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी साक्रीतील बैठकीत आवाहन केले़
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली़ या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र मराठे, सरचिटणीस प्रा़ नरेंद्र तोरवणे, जितेंद्र बिरारीस, साक्री विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास देसले, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, साक्री तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती देसले, करीम शहा यांच्यासह अन्य पदाधिकारी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे़ सर्वांनी एकत्र येऊन जास्तीच्या जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असावे़
तालुका अध्यक्ष जितेंद्र मराठे म्हणाले, मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर साक्री तालुक्यातून जास्तीत जास्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून दिलेले आहेत़ जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पदासह सभापती पदेही भूषविलेले आहेत़ साक्री तालुका पंचायत समितीमध्ये एकदा एक हाती सत्ता प्रस्थापित केली तर दुसºयांदा आघाडी धर्म पाळून काँग्रेसच्या बरोबरीने उपसभापती पद भूषविलेले आहे़
प्रदेश पातळीवरील निर्णय मान्य करावा
आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवाव्यात किंवा कसे याबाबत प्रदेश आणि जिल्हा पातळीवरुन जो निर्णय होईल तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल़ परंतु जागा वाटप करत असताना साक्री तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान ११ जिल्हा परिषदेचे गट आणि २२ पंचायत समितीच्या गणांमध्ये तिकीटे मिळावेत, या सर्व जागा निवडून आणण्याकरता जिल्ह्यातील आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करतील, असे ठरविण्यात आले़
पक्षातून गेलेल्यांना यापुढे कधीही थारा नाही
एक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील परंतु अडचणीच्या काळात पवार साहेबांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेलेल्या लोकांना पक्षांमध्ये पुन्हा थारा देण्यात येणार नाही, असेही किरण शिंदे यांनी आर्वजून सांगितले़
या बैठकीमध्ये तालुक्यातून विविध भागातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी निसंकोचपणे आपली मते व्यक्त केलीत़
शरद पवार यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपली निष्ठा असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या़
शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती़