रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरितपूर्ण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:38+5:302021-09-07T04:43:38+5:30
*यात्री सुविधा समितीकडे नगरपंचयत, प्रवासी संघटनेची मागणी* शिंदखेडा :- येथील शिंदखेडा चिमठाणे रोडवर रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन ...

रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरितपूर्ण करावे
*यात्री सुविधा समितीकडे नगरपंचयत, प्रवासी संघटनेची मागणी*
शिंदखेडा :- येथील शिंदखेडा चिमठाणे रोडवर रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून धीम्या गतीने सुरू असून ते तात्काळ पूर्ण करून शिंदखेडा रेल्वे स्थानकावर नवीन तीन जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी केंद्रीय रेल्वे बोर्ड (यात्री सुविधा समिती) रेल मंत्रालय भारत सरकार श्री डॉ राजेन्द्र फडके-जळगांव, श्री छोटुभाई पाटील-सुरत, श्री कैलाश वर्मा-मुंबई, श्री गिरीश राजगोर-भरुच, एडव्होकेट विभा अवस्थी-रायपूर हे शिंदखेडा रेल्वेस्टेशनवर सदस्य आले असता, त्यांना नगरपंचायतचे गटनेते अनिल वाणखेडे,उपनगराध्यक्ष भिला पाटील, कृउबा समिती चेअरमन तथा भाजप जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे,प्रवाशी संघटनेचे दादा मराठे,भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी यांनी निवेदन देऊन करण्यात आली
शिंदखेडा चिमठाणे दरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम गेल्या मे २०१९ पासून सुरू आहे संबधित ठेकेदाराने १३ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित होते आतापरेनंत ७० टक्के काम झाले असून उर्वरित ३० टक्के काम सदर ठेकेदार धीम्या गतीने करीत असून प्रवेशासाठी पर्यायी मार्गावर काळी माती टाकली असून थोडा जरी पाऊस झाला तरी यावरून वापर करणारे वाहन धारकाचे वाहन सतकट असल्याने लहान मोठे अपघात होत आहेत खास करून मोटारसायकल स्वार चे अपघात होत आहेत म्हणून संबंधित ठेकेदाराला समज देऊन तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली तसेच शिंदखेडा रेल्वे स्थानकात पुरी अहमदाबाद, भागलपूर सूरत भागलपूर,व अहमदाबाद बरौली, या तीन जलद गाड्याना थांबा द्यावा तसेच स्थानकात प्रवाश्यांना लवकरात लवकर जनरल तिकीट चालू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली
यावेळी शिंदखेडा स्टेशन अधीक्षक नीरज अग्रवाल, राजकुमार कोरी, प्रमोद ठाकूर, चेतन सावळे व अन्य रेल्वे कर्मचारी गण उपस्थित होते त्यावेळी कर्मचारी राहुल मराठे यांनी प्रवाश्यांना होणाऱ्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या त्यात प्रवाश्यांना लवकरात लवकर जनरल तिकीट चालू करण्यात यावे यावर यात्री सुविधा समिती च्या सदस्यांनी दोन्ही मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.या अगोदरही रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनाही प्रत्यक्ष जाऊन देण्यात आले आहे