जळगाव घरकूल प्रकरणी १ आॅगस्टला कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:48 IST2019-07-15T15:48:14+5:302019-07-15T15:48:39+5:30
धुळे न्यायालय : संशयितांची हजेरी

जळगाव घरकूल प्रकरणी १ आॅगस्टला कामकाज
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणी पुढील कामकाज १ आॅगस्ट रोजी होणार आहे़
जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज येथील विशेष न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांच्यासमोर सुरु आहे़ सोमवारी येथील न्यायालयात याप्रकरणाचे कामकाज पार पडले़ डॉ़ नीळकंठ यांची प्रकृति अस्वस्थ असल्यामुळे त्या त्यांच्या दालनातच होत्या़ उपस्थित असलेल्या सर्व संशयित आरोपींची हजेरी घेण्यात आली़ यानंतर डॉ़ नीळकंठ यांनी त्यांच्या दालनात वकीलांची छोटे खानी बैठक घेतली आणि पुढील कामकाजाची १ आॅगस्ट तारीख निश्चित केली़ सोमवारी केवळ हजेरी व्यतिरिक्त अन्य कोणतेही कामकाज झाले नाही़ यावेळी नेहमीप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त होता़