सुद्दढ आरोग्यासाठी महिलांची वॉकेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:11 IST2020-01-20T23:11:27+5:302020-01-20T23:11:59+5:30

शिरपूर : बालाजी महिला सेवा समितीचा उपक्रम ; शहरातील विविध महिला मंडळाचा नोंदविला सहभाग

Women's Walkathon Competition for Better Health | सुद्दढ आरोग्यासाठी महिलांची वॉकेथॉन स्पर्धा

Dhule

धुळे : येथील बालाजी महिला सेवा समितीतर्फे रविवारी सकाळी ७ वाजता वॉकेथॉन (पायी चालण्याचा उपक्रम) आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात शहरातील महिलांनी, अनेक महिला मंडळांच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वॉकेथॉन स्पर्धेत नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, रिटा पटेल, माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, तस्नीम जळगाववाला, शिल्पा अग्रवाल, डॉ. राठी, सीमा रंधे, कल्पना राजपूत, रंजना गुजर, छाया ईशी, रेखा सोनार, संगीता थोरात उपस्थित होेते़ यावेळी सेवा हॉस्पिटलच्या डॉ. जयश्री निकम यांनी आरोग्यबाबत मार्गदर्शन केले तर जयश्रीबेन पटेल हस्ते महिलांना स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड वाटप करण्यात आले़ स्पर्धेत अग्रवाल महिला मंडळ, सिंधी महिला मंडळ, ब्राह्मण माहिला मंडळ, बोहरी समाज महिला मंडळ, मराठा पाटील मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, जैन महिला मंडळ, सोनार समाज महिला मंडळ, संगिता थोरात यांचे महिला समाज मंडळ, जैन समाज दोन महिला मंडळे, समृद्धी महिला मंडळ, लायनेस क्लब महिला, आद्य गौड समाज, रंजना गुजर यांचे महिला मंडळ, एकता महिला मंडळ, पटेल संस्थेच्या शिक्षिका, राजस्थानी महिला मंडळ, कलाल महिला मंडळ, राजपूत महिला मंडळ, शिंपी महिला मंडळ, जैन डेरावसी मंडळ सहभागी झाले होते.

Web Title: Women's Walkathon Competition for Better Health

टॅग्स :Dhuleधुळे