भारतीय मजदूर संघाने मांडल्या महिलांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:29+5:302021-03-09T04:38:29+5:30

.मागण्या अशा : महिला कामगार, कर्मचाऱ्यांना केवळ अत्यावश्यक परिस्थितीत रात्रपाळी द्यावी आणि त्यांच्या सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, प्रवास, ...

Women's issues raised by the Indian Trade Union Confederation | भारतीय मजदूर संघाने मांडल्या महिलांच्या समस्या

भारतीय मजदूर संघाने मांडल्या महिलांच्या समस्या

.मागण्या अशा : महिला कामगार, कर्मचाऱ्यांना केवळ अत्यावश्यक परिस्थितीत रात्रपाळी द्यावी आणि त्यांच्या सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, प्रवास, तसेच विश्रामगृहाची व्यवस्था करावी, लैंगिक अत्याचार समित्यांच्या कामकाजाचा आढावा वेळोवेळी घ्यावा, घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी गावपातळीपर्यंत घरगुती हिंसाचार निर्मूलन समित्यांची स्थापना करावी, कामाच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय करावी, सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ५०० मीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह तयार करावे, गृहिणीच्या कामाचे मूल्य निश्चितस्रून त्याचा अंतर्भाव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा, घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार कल्याण मंडळ बोर्ड कार्यान्वीत करावे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारी कर्मचारी घोषित करावे व त्यानसार किमान वेतन द्यावे, राष्ट्रीय शिक्षा नीती २०२० च्या अंतर्गत देशातील अंगणवाडी केंद्रांना प्राथमिक शाळांची मान्यता देऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्री-प्रायमरी शिक्षकाचा दर्जा द्यावा, लाखो महिलांचा रोजगार वाचविण्यासाठी संबंधित काद्यात दुरुस्ती करावी, खाणींच्या आत दूर अंतरापर्यंत काम करणाऱ्या महिला कामगार, कर्मचारी यांना योग्य सुरक्षा, तसेच सुविधा द्याव्या, राज्य परिवहन सेवेत वाहक व चालक पदावर कार्यरत असणाऱ्या महिलांना विश्रामगृह व सुरक्षा सुविधा द्याव्या, प्रवासी मजुरांचे नूतनीकरण, पंजीकरण लवकरात लवकर करावे, ईएसआयसी रुग्णालयांची संख्या वाढवावी, बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, तसेच इतर सुविधा द्याव्या, धुळे जिल्ह्यात बांधकाम मंडळाचे डब्लूएफसी स्वतंत्र कार्यालय तातडीने सुरू करावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

निवेदनावर भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हाध्यक्ष सुनील देवरे, सरचिटणीस घनश्याम जोशी, बी. एस. कुलकर्णी, महिला आघाडीप्रमुख संगीता चाैधरी, सविता गोसावी, आशा खोंडे, उषा जगताप, सोनाली माळी, सोनाली बागुल, रेखा चत्रे, शिला शिंदे, गुलाब भामरे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष किशोरा सोनवणे, धुळे तालुकाध्यक्ष लोटण मिस्तरी, धुळे महानगरप्रमुख हरी धुर्मेकर, सर्व पंथ मंच रियाज पठाण, अनिल पोतदार, शशी महूकर, आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Women's issues raised by the Indian Trade Union Confederation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.